Ram Shinde Vs Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Vs Congress : फडणवीससाहेब तुमच्यासाठी 'बेअरर चेक'; योजनेसाठी काँग्रेसनं आमदार शिंदेंना डिवचलं

Pradeep Pendhare

Ahmednagar News : भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर एवढा विश्वास आहे की, त्यांनी शिंदेंसाठी आपण 'बेअरर चेक' आहोत, असे म्हटलं होते.

हाचा धागा पकडत, काँग्रेसने टायमिंग साधलं आणि कृष्णा-भीमा स्थिरकरण योजनेतून पाणी आणून कर्जत-जामखेड तालुका दुष्काळमुक्त करावा, अशी मागणी करत आमदार राम शिंदेंना डिवचलं.

कर्जत-जामखेड तालुक्यातील अवर्षण प्रवण यासह दुष्काळी गावासाठी शिंपोरा ते खुंटेफळ या पाणीपुरवठा योजनेतून पाणी उपलब्ध करण्याबाबत भाजप (BJP) आमदार राम शिंदे यांनी राजकीय वजन वापरावे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे यांनी दिले. शेवाळे यांनी कर्जत-जामखेडमधील दुष्काळी स्थितीवर पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. यावेळी बापूसाहेब काळदाते, युवक काँग्रेसचे सचिन घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील आदी उपस्थित होते.

कैलास शेवाळे म्हणाले, "कर्जत-जामखेड तालुक्यातील अवर्षण प्रवण दुष्काळी आणि टँकरयुक्त गावांना शिंपोरा ते खुंटेफळ या पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्यात यावे". आजतागायत पाणी वाटपासंदर्भात कर्जत-जामखेड तालुक्यासाठी फक्त आश्वासन आणि घोषणाच झाल्या. त्याची अंमलबजावणी मात्र कधीच झाली नाही, असा आरोप देखील काँगेसचे (Congress) शेवाळे यांनी केला.

तर कर्जत-जामखेड दुष्काळमुक्त

आष्टी तालुक्यातील कृष्णा-भीमा स्थिरकरण योजनेला महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुती सरकारने स्थगिती दिली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे या योजनेची दखल घेत शिपोरा ते खुटेफळ या 72 किलोमीटर पाणी योजनेस 1100 कोटी रुपये खर्चाची मान्यता दिली. ही योजना कर्जत शहराजवळून जात आहे. या योजनेवरून कर्जत-जामखेडला पाणी उपलब्ध करता येईल, याकडे कैलास शेवाळे यांनी लक्ष वेधले. या मागणीसाठी आता आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे कैलास शेवाळे यांनी सांगितले. वेळप्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशाराही शेवाळे यांनी दिला.

फडणवीसांच्या विधानाची आठवण

काँग्रेसचे शेवाळे यांनी आमदार राम शिंदे यांना त्यांच्या राजकीय वजनाची आठवण करून दिली. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंसाठी आपण 'बेअरर चेक' आहोत, असे म्हटले होते. याची आठवण काँग्रेसचे कैलास शेवाळे यांनी आमदार शिंदेंना करून योजना मार्गी लावण्यासाठी वजन वापरावे, असं आवाहन केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT