Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : 'राज्यात महिला सुरक्षित नाहीत, तरीही सत्ताधारी..' ; बाळासाहेब थोरातांचा महायुती सरकारवर निशाणा!

Balasaheb Thorat Criticism of Mahayuti government : राज्यात विकासाच्या नावाखाली वेगळेच राजकारण सुरू आहे. घमेंडी सरकारविरुद्ध जनतेचा रोष वाढला असून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. "राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सत्ताधारी सरकारी पैशावर मेळावे घेण्यात गुंतलेत. प्रशासनावर धाक राहिला नसल्यामुळे राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. या सत्ताधाऱ्यांकडे विकास हा फक्त दिखावा आहे. विकासाच्या नावाखाली राज्यात वेगळेच राजकारण खेळले जात आहे", असा घाणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला.

बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)संगमनेरमधील खराडी या गावात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. "राज्यकर्ते सध्या वेगळेच कार्यक्रमांमध्ये गुंतले आहेत. सरकारी पैशातून मिळावे घेतले जात आहेत. यातून भ्रष्टाचार वाढला आहे. कार्यक्रमांचा एवढा अतिरेक झाला आहे की प्रशासनावर सरकारचा धाकच राहिलेला नाही", असा आरोप देखील बाळासाहेब थोरात यांनी केला.

राज्यात महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) धोरण सर्व समावेशक आहे. राज्याच्या प्रगतीच्या आहे. त्यामुळे जनतेकडून महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात राज्यात सत्ता परिवर्तन अटळ असून महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. माजी आमदार सुधीर तांबे, दुर्गा तांबे, रामदास वाघ, रणजीतसिंह देशमुख आधी यावेळी उपस्थित होते.

बाहेरच्या तालुक्यातील लोकांना थारा देऊ नका-

"संगमनेर तालुक्यात निरंतर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे राज्यात ते अव्वल आहे. सहकार, शिक्षण, शेती आणि रोजगार यांची चांगली सांगड संगमनेरमध्ये दिसते. विकास कामे करताना कधी कोणाचीही अडवणूक केली नाही. उलट आपल्या शेजारचे लोक आपल्या तालुक्यातील येऊन विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत. अशा लोकांना थारा देऊ नका", असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

सरकारला सत्तेतून खाली खेचा - सुधीर तांबे

माजी आमदार सुधीर तांबे यांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली. "राज्य सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहेत. परंतु त्यांच्या भूलथापांना आत्ताची जनता बळी पडणार नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त फसवा कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. राज्यावर या सरकारने आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. या सरकारला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे", असे सुधीर तांबे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT