नंदुरबार : बॅंकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता दुय्यम निंबधक व तलाठीच्या मदतीने परस्पर विक्री करून बॅंकेची रक्कम न भरता फसवणूक केल्याप्रकरणी येथील नगरसेविका सुरेखा मराठे (Surekha Marathe) व त्यांचे पती तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र काशीराम मराठे (Ravindra Kashiram Marathe) यांच्यासह त्यांना सहाय्य करणारे दुय्यम निंबधक व तलाठीविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा (Fianancial Fraud case registered) गुन्हा दाखल झाला आहे.
नंदुरबार शहरातील आर. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष रवींद्र मराठे, त्यांच्या पत्नी तथा नगरसेविका सुरेखा मराठे यांनी त्यांच्या मालकीची जमीन (मालमत्ता) येथील युनियन बॅंक ऑफ इंडियाकडे तारण ठेवून चार कोटी ५९ लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र, ती मालमत्ता मराठे दांपत्याने २००८ ते २०१८ दरम्यान तत्कालीन दुय्यम निंबधक नंदुरबार व तलाठी यांच्या संगनमताने मालमत्तेवरील बोजा न दाखवता व बॅंकेकडे तारण नसल्याचे भासवून ती परस्पर विक्री केली. ही बाब युनियन बॅंकेचे शाखाधिकारी भटूसिंग कूर यांच्या लक्षात आली. त्यात बॅंकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे श्री. ठाकूर यांनी बुधवारी (ता. २०) नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मराठे दांपत्यासह तत्कालीन दुय्यम निंबधक व तलाठीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर तपास करीत आहेत.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.