Hiraman Khoskar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman khoskar : आमदार खोसकर यांचे काँग्रेस श्रेष्ठींना आव्हान; म्हणाले, नेत्यांनी...

Congress Cross voting Hiraman Khoskar Challenge to senior leaders : "काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बरोबरच मी मतदानाला गेलो होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी मतदान केलं आहे. मी माझे मतदान पक्षाच्या सूचनेनुसार शिवसेनेचे उमेदवार नार्वेकर यांना दिलं आहे."

Sampat Devgire

Hiraman Khoskar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. याबाबत पक्षश्रेष्ठी गंभीर आहेत. त्यामुळे त्याचे पडसाद आमदारांमध्ये ही उमटल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता या संदर्भात इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.

क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांमध्ये खोसकर यांचाही उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणात जाणीवपूर्वक आपले नाव घेतले जात आहे, मात्र मी कोणतेही क्रॉस वोटिंग केलं नसल्याचं खोसकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बरोबरच मी मतदानाला गेलो होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी मतदान केलं आहे. मी माझे मतदान पक्षाच्या सूचनेनुसार शिवसेनेचे उमेदवार नार्वेकर यांना दिले आहे. माझ्या मतदानाची पक्ष नेत्यांनी कधीही खातरजमा करून पहावी. हवे तर न्यायालयात जाऊन माझे मतदान देखील तपासता येईल. जर मी दोषी आढळलो तर कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याचे आपली तयारी आहे, असे आव्हान खोसकर यांनी काँग्रेस नेत्यांना दिले आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. याबाबत राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दुसरा दिला आहे. दुसऱ्यांदा राज्यात असा प्रकार घडला आहे. काँग्रेसची मते फुटली आहेत. त्यामुळे नेत्यांचे आमदारांवर नियंत्रण नाही, अशी टीका होत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी चौकशी केली आहे.

त्याचा अहवाल दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला आहे. या संदर्भात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? याची आता उत्सुकता आहे. त्याचे पडसाद काँग्रेसचे (Congress) आमदारांमध्ये पडले आहेत. क्रॉस वोटिंग केलेल्या काँग्रेसच्या एका गटांने या कारवाईला आव्हान देण्याची तयारी केली आहे. काही आमदारांनी थेट नेत्यांनाच सवाल केले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले क्रॉस वोटिंग काही आमदारांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना माध्यमांकडून सातत्याने प्रश्न केले जात आहेत. थोरात देखील या विषयावर गंभीर आहेत. आपण अहवाल पाठविला आहे. त्यात कोणाची नावे आहेत हे गोपनीय आहे. जो काही निर्णय होईल तो काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी घेतील, असे आमदार थोरात यांनी नुकतेच म्हटले आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय झाल्यास क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांची कारवाई बरोबरच आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीही जाऊ शकते. त्यामुळे या आमदारांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते. या चिंतेने अनेक आमदारांची झोप उडाली आहे यात आमदार खोसकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे खोसकर यांचे समर्थक सध्या अस्वस्थ झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT