shirish kotwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: भाजपाने विरोधकांचे मनसुबे उधळले, काँग्रेसचा माजी आमदार भाजपला शरण, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश!

Congress District President Shirish Kotwal joins BJP today, Two former corporators also likly to join, CM Devendra Fadnavis will present-नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी खेळी यशस्वी, माजी आमदार शिरीष कोतवाल भाजपच्या गळाला

Sampat Devgire

Devendra Fadnavis News: भाजपने नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोठा डाव खेळला आहे. त्यांनी चक्क काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष फोडला. या जिल्हाध्यक्षाचे गेले काही महिने भाजपशी पडद्याआडून सख्य चर्चेत असल्याने हा प्रवेश अपेक्षितच होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सहा हजार कोटींच्या कामांच्या भूमिपूजनाचा बार उडवणार आहेत. यावेळी ते नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवतील. मात्र त्यांचा दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कोतवाल यांनाच गळाला लावले आहे. निमित्ताने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग दुसरा जिल्हा अध्यक्ष भाजपवासी होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ शेवाळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. ऐन निवडणुकीत त्यांनी भाजप प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला होता. त्या पाठोपाठ आता नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार शिरीष कोतवाल यांनीही भाजपची वाट धरली आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिरीष कोतवाल सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले होते. यंदा त्यांचा अतिशय मानहानीकारक पराभव झाला होता. चांदवड मतदारसंघाच्या राजकारणात मलाच उमेदवारी हवी, मीच नेतृत्व करणार या अट्टहासातून त्यांचे अनेक सहकारी बाजूला झाले होते.

गेले काही दिवस भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी माजी आमदार कोतवाल यांना मधाचे बोट लावले होते. विधानसभा निवडणुकीनंतर श्री कोतवाल पूर्णतः निष्क्रिय झाले होते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री कोतवाल भाजप प्रवेश करणार अशी चर्चा होती. कोतवाल मात्र कालपर्यंत त्याचा इन्कार करीत होते.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात माजी आमदार कोतवाल भाजपचे कमळ हाती घेतील. त्यांच्यासोबतच विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीपासून अंतर ठेवलेल्या दोन माजी नगरसेवकांचाही प्रवेश चर्चेत आहे.

चांदवड नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने मोठी खेळी केली आहे. आता भाजप विरोधात कोण पॅनल करणार ही चर्चा पुढे आली आहे. श्री कोतवाल यांनी सगळ्यांना गाफील ठेवून महाविकास आघाडीला खिंडीत गाठले आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश निष्ठावंत कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT