Jalgaon Political News: राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडल्यानंतर आता राज्यात काँग्रेसला दुसरा झटका बसणार आहे. जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व त्यांची कन्या डॉ.केतकी पाटील भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत, त्या बाबत स्वतः माजी खासदार डॉ. पाटील यांनीच जाहीर केले आहे.
मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून त्यांना या प्रवेशामुळे भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
या प्रवेशाबाबत डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास व प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. या विकासयुगाच्या वाटचालीत आपणही सहभागी व्हावे म्हणून आपण कन्या डॉ केतकी पाटीलसह भाजपत प्रवेश करीत आहोत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.