Balasaheb-Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics: बाळासाहेब थोरात संतापले, 'सरकारकडून मंत्र-तंत्राचे अभ्यासक्रम यापेक्षा वाईट काहीच नाही'

Congress leader Balasaheb Thorat's criticism, Mantra Tantra curriculum is bad, solve farmers' problems -काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्र-तंत्र सुरू करण्यावर राज्य सरकारचे कान टोचले

Sampat Devgire

Balasaheb Thorat News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही निर्णय घेतले. नाशिकच्या आयटीआय मध्ये नवा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यावरून मोठा राजकीय वाद होण्याची चिन्हे आहेत.

नाशिकच्या आयटीआय या संस्थेत राज्य शासन नवा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. मंत्र-मंत्र यावर आधारित हा अभ्यासक्रम असेल. त्यामुळे पुरोहितांची कमतरता भासणार नाही, असा सरकारचा दावा आहे. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसापूर्वी त्याची माहिती दिली.

यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सरकारवर चांगलेच संतापले. तंत्र मंत्र अभ्यासक्रम सुरू करून नव्या पिढीला आपण कोणती दिशा दाखवत आहोत. तरुणांनी देशाचे भवितव्य घडवायचे असते. त्यांना आधुनिकतेकडे नेणारे स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. त्यांना तंत्र-मंत्र शिकवणे योग्य आहे का? असा प्रश्न थोरात यांनी केला.

मंत्र-तंत्राचे अभ्यासक्रम सुरू करत असाल तर त्यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही. असे धडे देण्याऐवजी सरकारने आपल्या मूळ कामाकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात अतिवृष्टीचे मोठे संकट आहे. ती जबाबदारी प्रामुख्याने पार पाडण्याची हक्क गरज आहे.

युवकांना तंत्र-मंत्राचे धडे देण्याऐवजी आपाद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. अद्याप राज्यात अनेक ठिकाणी संकटग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. मराठवाड्यात कुठे आणि किती मदत दिली? हे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान थोरात यांनी दिले.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांच्या मदती ऐवजी अन्य विषय काढायचे. लोकांना धर्मात आणि जातीत घेऊन जायचे. त्यांचे लक्ष विचलित करायचे. या सर्व गोष्टी सरकारकडून होत असल्याचा, गंभीर आरोप थोरात यांनी केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT