Kunal Patil & Sachin Sawant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sachin Sawant Politics: सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांना टोला, भाजपचे प्रवेश तपासयंत्रणांच्या भीतीपोटी?

Congress leader Sachin Sawant hits back at former MLA Kunal Patil's BJP entry- महाराष्ट्रातील भाजपचे सरकार हे भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत प्रतीक असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली

Sampat Devgire

Sachin Sawant on Kunal Patil: तीन पिढ्या काँग्रेस समवेत राहिलेल्या माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकताच भाजप प्रवेश त्यांच्या प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला. मात्र यातून सावरण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुढाकार घेतला आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यातील भाजप आणि महायुती सरकारवर कठोर शब्दात टीका केली. राज्यातील भाजपचे सरकार हे भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत प्रतीक आहे. सामान्य जनता हे सरकार आल्यानंतर पश्चाताप करीत असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.

माजी आमदार कुणाल पाटील यांनी भाजप प्रवेश केला. त्यावर सावंत यांनी माजी आमदार पाटील यांचा नामोल्लेख टाळत, जे लोक तपास यंत्रणांना घाबरतात त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांनी विचार करणे सोडून द्यावे. भाजप पक्षात नुकतेच झालेले सर्व प्रवेश हे दबावापोटी आणि भीती निर्माण करून झाले आहेत. राज्यातील जनतेला उघड्या डोळ्यांनी हे पहावे लागत आहे.

भाजप आपली सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून विविध तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना संपविण्यासाठी करीत आले आहे. सत्तेत आल्यावर भाजपने देशभर ही मोहीम राबवून अनेक प्रामाणिक आणि जनतेशी बांधील की असलेल्या नेत्यांना संपविण्याचे काम केले. त्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला.

धुळे जिल्ह्यात काही लोक पक्ष सोडून गेले मात्र निष्ठावंत आणि काँग्रेसच्या विचारावर श्रद्धा असलेले पदाधिकारी कार्यकर्ते अद्यापही तळागाळात लोकांची संपर्क ठेवून आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी काळात काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी काम करावे लागेल. या निमित्ताने नव्या नेतृत्वाला आणि युवा वर्गाला मोठी संधी काँग्रेस पक्ष उपलब्ध करून देईल.

कोणीही पक्ष सोडून गेला तरीही काँग्रेस पक्ष संपणार नाही. काँग्रेस पक्ष हा एक विचार आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षात आल्यावर देशभर चळवळीला व्यापक स्वरूप मिळाले. देश स्वतंत्र झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली. मात्र काँग्रेस पक्ष त्यानंतरही त्याच गतीने आणि जनमानसात आपले स्थान बळकट करत आला आहे.

यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी खासदार बापू चौरे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे पितांबर महाले साबिर शेख मुजफ्फर हुसेन यांसह पक्षाचे जुने जाणते नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाला अधिक प्रबळ करून लोकांमध्ये जाण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. निमित्ताने माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पश्चात पक्षाला आणि कार्यकर्त्यांना धुळे शहर आणि जिल्ह्यात नवी ऊर्जा देण्यासाठी प्रवक्ते सावंत यांनी पुढाकार घेतला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT