Bharat Gavit with supporters
Bharat Gavit with supporters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP news; सुरूपसिंग नाईक यांची सत्ता संपली, भाजपचे गावित झाले अध्यक्ष

Sampat Devgire

नवापूर : डोकारे (नवापूर) (Nandurbar) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या (Trible) अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भाजपचे (BJP) तालुकाध्यक्ष भरत माणिकराव गावित, (Bharat Gavit) तर उपाध्यक्षपदी जगन चंद्रा कोकणी (Jagan Kokani) यांची बिनविरोध निवड झाली. (Bjp`s Bharat Gavit elected as Chairmen of dokare Sugar factory)

डोकारे साखर कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष असलेले काँग्रेसचे नेते सुरूपसिंग नाईक यांच्या कारकिर्दीत सलग चार निवडणूक बिनविरोध झाल्या होत्या. पंचवीस वर्षे त्यांची या कारखान्यावर एकहाती सत्ता होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा राजकीय धक्का मानला जातो.

डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २४ डिसेंबरला झाली होती. यात परिवर्तन पॅनलचे १४ सदस्य निवडून आले, तर शेतकरी विकास पॅनलचे दोन बिनविरोध व एक निवडून असे तीन सदस्य आले होते. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी (ता. ४) कारखान्याच्या सभागृहात झाली.

सकाळी अकराला निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर, रत्ना मोरे व नीरज चौधरी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली. अध्यक्षपदासाठी परिवर्तन पॅनलचे भरत गावित व उपाध्यक्षपदासाठी जगन कोकणी या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यात अध्यक्षपदी गावित, तर उपाध्यक्षपदी कोकणी यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

या वेळी आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित, माजी आमदार शरद गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नवनिर्वाचित संचालक जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीता गावित, बकाराम गावित, रमेशचंद्र राणा, हरिदास गावित, आलू गावित, देवराम गावित, रमेश गावित, लक्ष्मण कोकणी, रावजी वळवी, रुद्राबाई वसावे, मीराबाई गावित, सीतारामर ठाकरे उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT