MLA Kunal Patil
MLA Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार कुणाल पाटील यांचा भाजपला `जोर का झटका`

Sampat Devgire

धुळे : येथील (Dhule) जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी पॅनलचे तीन उमेदवार सोमवारी बिनविरोध निवडून आले. यामुळे भाजपप्रणीत (BJP) परिवर्तन पॅनलला निवडणुकीच्या सुरवातीलाच आमदार पाटील यांच्या जवाहर पॅनलने झटका दिला आहे. (Congress MLa Kunal Patil keep lead in cooperative of Dhule)

जवाहर पॅनलच्या रणनितीमुळे परिवर्तन पॅनलला सूचक, अनुमोदकच मिळाला नाही. सूतगिरणीचे अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी पॅनलचे अमर शिवाजी देसले, गणेश सीताराम चौधरी, सर्जेराव मखा पाटील बिनविरोध निवडून आले.

सूतगिरणीची ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोनवारी अंतिम मुदत होती. त्यानुसार माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून आमदार पाटील, कन्हय्यालाल पाटील, दत्तात्रय परदेशी, बाबाजी देवरे, प्रमोद कचवे, प्रमोद जैन, संतोष पाटील, अविनाश पाटील, नानाभाऊ माळी, रमेश पाटील, जितेंद्र पवार, नागेश देवरे, नंदू पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, यशवंत खैरनार, गुलाब कोतेकर, अनिल कचवे, बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून सर्जेराव पाटील, महिला प्रतिनिधी प्रतिभा पाटील, नंदिनी ठाकरे, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून कुणाल दिगंबर पाटील, विजय पाटील, गुलाब कोतेकर, एससी/एसटी मतदारसंघातून रमेश पारधी, अमृत भिल यांचे अर्ज दाखल झाले.

याशिवाय भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून भिका पाटील, सोमनाथ पाटील आणि बिगर कापूस उत्पादक मतदारसंघातून गणेश चौधरी, अमर देसले यांनी अर्ज दाखल केले.

जवाहर सूतगिरणीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि शेतकरी, कामगारहितासाठी जवाहर शेतकरी पॅनल आहे. अडचणीच्या काळातही सक्षमपणे सुरु असलेला सूतगिरणीसारखा चांगला प्रकल्प बंद पाडण्याचे, कामगारांचे भवितव्य उद्‌ध्वस्त करण्याचे विरोधकांचे कटकारस्थान असून त्यांचे मनसुबे उधळून लावू, असे आमदार पाटील यांच्या गोटातून सांगण्यात आले. सुस्थितीतील प्रकल्पात राजकारण आणून तो कसा बंद पडेल, असा विरोधकांचा डाव हाणून पाडू, असे मावळते संचालक विजय देवरे, पंढरीनाथ पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, प्रदीप देसले, भाऊसाहेब बोरसे, शांतिलाल पाटील आदींनी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT