Lahu Kanade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Lahu Kanade : युवकांनी भाजपचा खरा चेहरा समोर आणावा; आमदार कानडेंचा हल्लाबोल

Lahu Kanade On BJP : काँग्रेस पक्षाच्यावतीने श्रीरामपूरमध्ये मेळावा आयोजिण्यात आला होता.

सरकारनामा ब्यूरो

महेश माळवे

Ahmednagar News : 'काँग्रेस पक्षाने लोकशाहीपद्धतीने कारभार करून समतेचा विचार रुजविला. युवकांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून काँग्रेस पक्षाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवून भाजप सरकारचा खरा चेहरा समोर आणावा,' असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.

काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे बूथ प्रतिनिधी, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कानडे म्हणाले, "काँग्रेसने (Congress) सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन देशाचा विकास केला. भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून हे चक्र उलटे फिरण्यास सुरुवात केली. त्यासाठी संघटितपणे कट करून सतत खोटे सांगून दिशाभूल केली. राम मंदिराच्या नावावर राजकारण सुरू केले. शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होतील, उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगितले. त्यांच्या अंधभक्तांनी त्याचा खोटा प्रचार केला. परंतु, तसे काही झाले नाही. इथेनॉल उद्योगात 70 हजार कोटीची गुंतवणूक असताना इथेनॉलवर बंदी घालून हा निर्णय पुन्हा बदलण्याची वेळ आली. जनतेकडून वस्तू सेवा कराच्या माध्यमातून पैसा गोळा केला," असा हल्लाबोल कानडेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 22 जानेवारीच्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आपणही कार्यकर्त्यांना घेऊन तेथे जाणार असल्याचेही आमदार कानडे यांनी सांगितले.

'मतदान प्रतिनिधींची जबाबदारी वाढली'

निवडणूक आयोगाने 80 वर्षांपुढील व्यक्तीचे मतदान घरी जाऊन घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे. काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर अधिक भर दिला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या साधनांचा वापर वाढवावा लागणार आहे. तरुणांनी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहाचवावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी केले.

(Edited By Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT