Chandrkant Raghuwanshi & K. C. Padve of Nandurbar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नंदूरबारला काँग्रेस-शिवसेना सत्तेत तर भाजप राहणार उन्हात!

नंदुरबार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद आणि दोन विषय समिती सभापती पदांची निवडणूक २५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

Sampat Devgire

दिनू गावित

नंदुरबार : जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिवसेना काँग्रेसची (Shivsena- Congress Alliance) सत्ता आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने पोटनिवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावूनही ते सत्तेपासून वंचित राहणार आहेत.

नंदुरबार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद आणि दोन विषय समिती सभापती पदांची निवडणूक २५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मुळे ११ सदस्य अपात्र ठरले होते; यामध्ये सर्वाधिक ७ जागा भाजपाला गमवाव्या लागल्या होत्या. रद्द झालेल्या पदांसाठी आयोगाकडून खुल्या प्रवर्गासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना-काँग्रेसची सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान रद्द झालेल्या पदांपैकी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद आणि दोन विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. पोट निवडणुकीत भाजपाला ३ जागा गमवाव्या लागल्याने सभापती पदापासून दूर राहावे लागणार असल्याची शक्यता आहे, तर शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य पद वाढले. त्यामुळे शिवसेनेकडे उपाध्यक्ष पद व एक सभापती पद जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडे दोन सभापती पदे जाण्याची शक्यता आहे. सध्याची राजकीय समिकरणे पाहता शिवसेना- काँग्रेस निवडून येण्याची चर्चा रंगली आहे.

विषय समिती सभापती पदांसाठी राष्ट्रवादी आणि भाजपने देखील दावा केल्याने जिल्हा परिषदेचे गणित नेमकं कसं राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपद निवडीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुबार जिल्हा परिषदेतील सध्या स्थितीत असलेलं राजकीय पक्षनिहाय बलाबल पाहता भाजप काय डाव टाकतो याची उत्सुकता लागली आहे.

पक्षीय बलाबल असे,

एकूण सदस्य- ५६,

बहुमताची गरज- २८

काँग्रेस- २४

भाजप- २०,

शिवसेना- ८

राष्ट्रवादी- ४

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT