जळगाव : जिल्हा (Jalgaon) दूध संघ निवडणुकीत (Milk fedration election) दोन्ही पॅनलतर्फे मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीसह तालुकानिहाय मेळावे घेण्यात येत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. दोन्ही पॅनेलमध्ये जोरदार चुरस आहे. त्याचा लाभ मतदारांना (Voters) झाला असुन सहलीबरोबरच (Tours of voters) मतदारांची चांगलीच चंगळ झाली आहे. (Voters on tour due to intense political competition Milk fedration election)
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी, मतदानासाठी अवघे पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे श्री. खडसे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार’ व मंत्री महाजन व पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी’ पॅनलचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत.
दूध संघाच्या प्रचाराता तालुकास्तरावर बैठका घेऊन पॅनलची भूमिका समजावून सांगितली जात आहे. शिवाय नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. श्री. खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलतर्फे डबघाईस गेलेला दूध संघ चांगल्या अवस्थेत कसा आणला आहे, याची माहिती देण्यात येत आहे. संघ डबघाईस जाण्यास जबाबदार कोण आहेत, याचाही सवाल विचारला जात आहे. दोन्ही पॅनलतर्फे प्रचारपत्रकेही तयार करण्यात आली असून, त्याचेही मतदारांना वाटप करण्यात येत आहे. ‘महाविकास’ आघाडीच्या विजयासाठी श्री. खडसे यांनी आपली संपूर्ण ताकद लावली आहे.
दोन्ही मंत्री प्रचारात
जिल्ह्यातील भाजपचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील प्रचारात उतरले आहेत. याशिवाय मतदारांच्या भेटीही घेत आहेत. तालुका मेळाव्यात होणाऱ्या सभेतही एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात येत आहे. दोन्ही मंत्र्यांनी ‘शेतकरी’ पॅनलला विजयी करण्यासाठी पूर्णपणे ताकद लावली आहे.
मतदारांसाठी ‘सहली’चे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आहे. मतदारांची संख्या अत्यंत कमी असल्याने जेवढे मतदार येत असतील, त्यांना ‘सहल’ घडवून आणण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः देश व राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या गटातर्फे यासाठी अधिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या एक-दोन दिवसांत सहल आयोजित करून मतदारांना थेट मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात आणण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.