<div class="paragraphs"><p>Cordellia Criuse &amp; Aryan Khan</p></div>

Cordellia Criuse & Aryan Khan

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

या ड्रग्ज तस्करीपुढे ‘कार्डिलिया क्रूज’, आर्यन खान प्रकरण किरकोळ!

Sampat Devgire

जळगाव : देशभर गाजत असलेल्या ‘कार्डिलिया क्रूज’ (Cordelia cruise)आणि आर्यन खान (Aryan Khan) अंमली पदार्थ प्रकरण बुडबुडा वाटावा एव्हढे मोठे अंमली पदार्थ तस्करीचे (Drugs) प्रकरण उघडकीस आले आहे. प्रामुख्याने थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रईसजाद्यांच्या पार्ट्यांसाठी मध्यप्रदेश आणि गुजरातमार्गे हे अंमली पदार्थ मुंबई शहराकडे नेले जात असतांनाच ते पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

गुजरात- मुंबईतून समुद्री मार्गाने पाकिस्तान-अफगाणिस्तानातून अफू- चरस, हेरॉईन, ब्राउनशूगर या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. देशभर गाजत असलेल्या ‘कार्डिलिया क्रूज’ पार्टीवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अशाच रॅकेटच्या संशयातून मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)चे संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली हेाती. या ‘कार्डिलिया क्रूज’वर मिळालेल्या अमली पदार्थापेक्षा कितीतरी जास्त हेरॉईन- ब्राउनशूगर जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याने जळगाव जिल्‍हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थ तस्करीप्रकरणी शनिवारी ४५ वर्षीय महिलेस ताब्यात घेतले. अख्तरीबानो अब्दुल रऊफ असे तिचे नाव असून, तिच्या ताब्यातून पथकाने अंदाजे एक कोटी आठ हजार रुपयांचे अर्धा किलो हेरॉईन- ब्राऊनशूगर जप्त केली असून, रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रावेर शहरात सापळा रचण्यात आला. तहसीलदार उषाराणी देवगुणे, निरीक्षक कैलास नागरे, साहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे, शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, ईश्वर पाटील, अभिलाषा मनोरे यांच्यासह रावेर पोलिस ठाण्याच्या पथकाने डॉ. बाबासाहेबर आंबेडकर चौकात सापळा रचून अख्तख्तरी बानो अब्दुल रऊफ खान (वय ४५, रा. मोमीनपुरा, बडा कमेलापास, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे एक कोटी आठ हजारांचे (५०००.०४ ग्रॅम) सुमारे अर्धा किलो हेरॉईनचे दोन पॅकेट आढळून आले. पथकातील फॉरेन्सिक प्रयेागशाळा टीमने जागेवरच नमुने संकलित करून मोबाईलप्रयोग शाळेत शास्त्रीय पृथक्करण केल्यावर अतिसंवेदनशील हेरॉईन- ब्राऊनशूगर असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. संशयित महिलेस ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत रावेर पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी अधिनियम (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

अख्तरीबानो अब्दुल रऊफ या महिलेची चौकशी केल्यावर तिने जप्त हेरॉईन- ब्राऊनशूगरचे पॅकेट मंदसौर (ता. मध्य प्रदेश) येथील सलीम खानशेर बहादूर खान(रा. कटियानी कॉलनी, मंदसौर, मध्य प्रदेश) याच्याकडून घेतल्याची माहिती पोलिस पथकाला दिली असून, संशयित महिलेसह पथक मध्य प्रदेशात दाखल झाले असून, संशयित सलीम खान याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बाउनशूगर की, हेरॉईन

गुन्हे शाखेने जप्त केलेली पावडर नेमकी ब्राउनशूगर आहे की हेरॉईन, याची ठोस माहिती अधिकृत शासकीय प्रयोगशाळेत शास्त्रीय पृथक्करण अहवालातून समोर येणार आहे. हेरॉईन हे अतिशुद्ध रूप असून, पांढऱ्या क्रिस्टलाईन पावडर फार्ममध्ये तोळ्यावर त्याची विक्री केली जाते. याच हेरॉईन पावडरमध्ये चॉकलेटी रंगाचा पदार्थ मिश्रित केल्यावर एक ग्रॅम वजनाच्या हेरॉईनपासून चार ग्रॅम ब्राउनशूगर तयार केली जाते. प्रथमदर्शनी जप्त अमली पदार्थ हेरॉईन असण्याची दाट शक्यता पथकातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT