NMC Building Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नगरसेवक झाले `माजी`, लेटरहेड, बोधचिन्ह वापरल्यास दाखल होईल गुन्हा?

प्रशासनाच्या सूचनांमुळे लेटरहेडसह बोधचिन्हाचा वापर करण्यास नगरसेवकांना बंदी

Sampat Devgire

नाशिक : महापालिकेचा (NMC) निर्वाचीत सदस्यांचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे. त्यामुळे नगरसेवकांना आता माजी म्हणवून घ्यायची सवय लावावी लागणार आहे. त्यांच्या लेटरहेडची देखील रद्दी होण्याची शक्यता आहे. कारण लेटरहेड व बोधचिन्ह वापरल्यास पोलिसांत (Polics) गुन्हा दाखल होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Corporators not allowed to use there NMC letterheads as well Stamps)

महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी १४ मार्चला संपुष्टात आला असला तरी अनेक नगरसेवकांकडून उद्‌घाटन कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. परंतु, आता यापुढे उद्‌घाटन कार्यक्रमाला जाताना किंवा पत्रिकांवर नावे प्रसिद्ध करताना माजी लावावे लागणार आहे.

विद्यमान नगरसेवक म्हणून मिरवल्यास गैरवापर केल्यावरून गुन्हे दाखल होण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांनी दिली. त्याचबरोबर आता लेटरहेडसह महापालिकेचे बोधचिन्ह वापरता येणार नाही. वाहनांवरील बोधचिन्हदेखील हटवावे लागणार असल्याने या नियमांचे किती पालन होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

१४ मार्च २०१७ रोजी नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकला पहिल्या महासभेपासून प्रारंभ झाला होता. रंजना भानसी यांची महापौर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतरच्या दुसऱ्या अडीच वर्षासाठी सतीश कुलकर्णी महापौर राहिले. सहाव्या पंचवार्षिकची मुदत १३ मार्चला रात्री संपुष्टात आल्यानंतर १४ मार्चपासून प्रशासनाने सूत्रे हाती घेताना महापौर, उपमहापौरांच्या वाहनासह विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, प्रभाग समिती सभापतींची वाहने ताब्यात घेतली.

त्याचबरोबर कार्यालयांनादेखील टाळे ठोकण्यात आले. नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आला तरी अनेक ठिकाणी विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू आहे. वास्तविक निवडणुकीच्या तोंडावर कामे दाखविण्यासाठी नगरसेवकांची धडपड होती. उद्‌घाटने करताना नगरसेवकांकडून कामाचे श्रेय घेतले जात होते. मुदत संपुष्टात आल्यानंतरही कामांची उद्‌घाटने सुरू आहे. परंतु, त्या कार्यक्रमांमध्ये विद्यमान म्हणून मिरविले जात आहे. त्यामुळे आता विद्यमान म्हणून नगरसेवकांना मिरविता येणार नाही. नियमाप्रमाणे त्यांच्यावर ‘माजी’ असा शिक्का बसला आहे.

दुरुपयोग झाल्यास गुन्हा

विकासकामासह अन्य कामासाठी नगरसेवकांना लेटरहेड, तसेच बोधचिन्ह वापरण्याची परवानगी कार्यकाळात दिली जाते. कार्यकाळ संपुष्टात आल्याने माजी झालेल्या नगरसेवकांना लेटरहेड व महापालिकेच्या बोधचिन्हाचा वापर करता येणार नाही. लेटरहेडचा वापर करताना नावापूर्वी ‘माजी’ लावावे लागणार आहे. वाहनांवरील बोधचिन्हदेखील हटवावे लागणार आहे. बोधचिन्हासह लेटरहेडचा दुरुपयोग झाल्यास गुन्हे दाखल होवू शकतात, असे प्रशासनातील सूत्रांनी दिल्या.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT