Eknath Khadse- Jalgaon jillha dudh Sangh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिंदे-फडणवीसांना कोर्टाचा दणका; जळगाव जिल्हा दूध संघावरील प्रशासक नियुक्ती अवैध

राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिलासा; विद्यमान संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश

कैलास शिंदे

जळगाव : शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार राज्यात स्थापन झाल्यावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखालील जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघाचे (dudh Sangh) संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने प्रशासक नियुक्ती अवैध ठरवित संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला असून शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार चपराक बसली आहे. (Court bump to Shinde-Fadnavis; Appointment of Administrator on Jalgaon jillha dudh Sangh invalid)

जळगाव जिल्हा दूध संघावर एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत होते. खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे या संघाच्या अध्यक्षा आहेत. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मुख्य प्रशासकीय नेतृत्वाखाली प्रशासक मंडळ नियुक्त केले होते.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरूध्द संचालक मंडळाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (ता. ३० ऑगस्ट) निर्णय झाला असून न्यायालयाने जिल्हा दूध संघावरील प्रशासक मंडळ अवैध ठरवित विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा अधिकार बहाल केले आहेत, माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना खडसे यांनी सांगितले, की न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, ही प्रशासक नियुक्ती रद्द करण्याबाबतच्या आदेशविरूध्द सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही प्रशासक मंडळातर्फे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच, राज्य सरकारने जी जिल्हा दूध संघाची चौकशी लावली होती, ती सुध्दा थांबविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, एन. जे. पाटील यांनी जे आरोप संचालक मंडळावर केले आहेत. तेसुध्दा न्यायालयाने फेटाळले असल्याचे खडसे यांनी सांगितले. निकालाच्या बाबतीत बोलताना खडसे म्हणाले, सत्याचा नेहमी विजय होत असतो. न्यायालयाच्या या निकालाने राज्य सरकारला चांगलीच चपराक दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT