J. P. Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

माकपच्या जे. पी. गावितांच्या सुरगाणा गडाला हादरे

माकपचे सर्वाधिक ३३ सरपंच विजयी झाले, मात्र जागा ४३ वरून ३३ झाल्या.

Sampat Devgire

नाशिक : सुरगाणा (Nashik) तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये ६१ पैकी सर्वाधिक ३३ जागांवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) सरपंच विजयी झाले. मात्र गत निवडणुकीतील ४३ जागांवरून ही संख्या ३३ वर आल्याने या पक्षाला मतदारांनी आणि विशेषतः युवकांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. (Voters given alert for CPM in surgana for future politics)

अलंगुण - हिरामण गावित आणि साजोळे- काशिराम गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस) या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली होती.

तालुक्यातील भवाडा गटात हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदिर्घ काळ वर्चस्व राहिले आहे. मात्रयंदाच्या निवडणुकीत भवाडा गटात भवाडा, खिर्डी, बेडसे, बाऱ्हे, कळमणे तसेच पळसन गटात वरंभे, कुकडमुंडा, खोबळा, पळसन या गावांत पक्षाला काठावर विजय मिळाला आहे. विशेषतः राष्ट्रवादीला सरासरी २१०० ते २३०० तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला २३०० ते २७०० मते मिळाल्याने अवघ्या दोनशे मतांच्या फरकाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे बहुतांश युवकांचा कल राष्ट्रवादी तसेच विवेक पंडीत यांच्या संघटनेकडे वाढल्याचे दिसून आले. त्याचा भावी राजकारणावर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भक्कम संघटनात्मक बांधणी असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला हा इशारा आहे.

स्थानिक विकास आघाडीचे विजयी सरपंच असे, उंबरपाडा - चिमण लक्ष्मण पवार, हरणटेकडी- कौशल्य भास्कर चव्हाण, खोकरी- काशिनाथ गवळी, मांगधे- भारती चंद्रकांत भोये, मनखेड- नर्मदा मोहनदास भोये, हेमाडपाडा- पुंडलिक परशराम घांगळे.

माकपला ३३ जागा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विजयी झालेले सरपंच असे, घोडांबे - माया भोये, माळेगाव- अनिता भागवत गवळी, कळमणे- पांडुरंग गावित माकप, बिवळ- हेमलता हेमंत भुसारे, चिकाडी- सदू मनोहर बागुल, हातरुंडी- आनंदा पांडुरंग पवार, करंजुल- प्रभा भिका राठोड, कुकुडमंडा- यशवंत वाघमारे, पोहाळी- सुनिता दळवी (१ मताने विजयी), अंबाठा- हरी महारु चौरे, नागशेवडी- भारती बागुल, बुबळी- पप्पू राऊत, हट्टी- सुशिला हिमतन गायकवाड, माणी- कल्पना यशवंत चौधरी, भोरमाळ- बागुल, भवानदगड- धनश्री हाडळ, खुंटविहीर- आनंदा यशवंत झिरवाळ, पळसन- रंजना विठ्ठल चौधरी, काठीपाडा- रोहिणी चंद्रकांत वाघेरे, राशा- सिताराम भोये, चिंचपाडा- चौधरी, बा-हे- वैशाली देविदास गावित, उंबरठाण- गिरीश काशीराम गायकवाड, वरंभे- कौशल्य भास्कर चव्हाण, गोंदुणे- संजाबाई खंबायत, ठाणगाव- मनिषा योगेश महाले, बेडसे- भाऊ काळू भोंडवे, खिर्डी- शिवराम वळवी, भवाडा- कुसूम हरी जाधव, रघतविहीर- कमल जयवंत भोये, लाडगाव- संजिवनी जीवन चौधरी, खोबळा- पांडुरंग गायकवाड.

राष्ट्रवादी काँग्रेस:

राष्ट्रवादी काँग्रेसने पुढील ग्रामपंचायतीत यश संपादन केले. शिंदे - पुंडलिक पवार, रोकडपाडा - अनिता राजू पवार, म्हैसखडक- संगिता तुकाराम देशमुख, मांधा- मिरा तुळशिराम महाले, कुकुडणे-मजित जयराम चौधरी, डोल्हारे- राजेंद्र गावीत, बोरगाव- अशोक उत्तम गवळी, रोघांणे- कावेरी अशोक गुबांडे, वाघधोंड-रंजना सावळीराम देशमुख.

अपक्ष :

अपक्षांनी पुढील गावांत विजय संपादन केला, सराड - नामदेव भोये, मालग्वहाण- योगेश ठाकरे, कोठुळा- काजल गणेश गुंबाडे, हतगड- देविदास दळवी,

शिवसेना:

शिवसेनेचे विजयी सरपंच असे, डांगराळे - रतन आबाजी गावित, राहुडे - सुषमा विष्णू गांगुर्डे.

भारतीय जनता पक्ष:

प्रतापगड - वनिता विजय दळवी, भदर- झेंपा थोरात, जाहुले- अनुसया सुनील भोये, हस्ते- पुंडलिक परशराम बागुल. अंबोडे- राजेंद्र निकुळे,

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT