नाशिक : महाविकास आघाडी सरकार चालणार की नाही, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकार पाडण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे. मात्र, सरकार काम करत आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना लगावला आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या कळवण तालुक्यातील विविध विकासकांमाचे भूमिपूजन झाले. तसेच शेतकरी, आदिवासी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते. आमदार नितीन पवार यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यादरम्यान पवार यांनी राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर भाष्य केले. विशेष म्हणजे पवार यांनी नाशिककरांना विकास कामांसाठी निधीत कमी पडू देणार नाही. असेही आश्वासन दिले. तुम्ही आमची भावकी निवडून दिली. त्यामुळे तिजोरी माझ्याकडे आहे. आमदार नितीन पवार यांना काहीही कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही पवार यांनी दिले.
या वेळी पवार म्हणाले, आम्ही शपथ घेतल्यानंतर कोरोना आला. यामध्ये अनेक जवळचे लोक गेले. आणखी कोरोनाचा एक नवीन विषाणू आला आहे. मी काल आढावा घेतला. आज मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. आई बापाच्या पोटी एकदाच जन्माला येतो त्यामुळे काळजी घ्यायला हवी, असेही पवार म्हणाले. त्याच बरोबर त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचेही आव्हाण केले. विकासकामे झाली नाही तरी आरोग्यासाठी सरकार म्हणून आम्ही कमी पडणार नाहीत. आम्ही केंद्राशी बोलत आहेत. एका जोडप्यामुळे राज्यात किती लाख लोकांना कोरोना झाला. त्यामुळे बंधन असावे, अशी सूचना पवार यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.