Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : खुर्च्या सोडा....गावोगावी जा, लोकांना भेटा!

पालकमंत्री दादा भुसे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी घेताहेत परिश्रम.

Sampat Devgire

Minister Dada Bhuse news : येत्या शनिवारी (ता.१५) शहरात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमासाठी पालकमंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाला सक्रीय करण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. (Dada Bhuse appeal officers to leave offices and go to village)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात होणाऱ्या शासन (Maharashtra Government) आपल्या दारी उपक्रमाचा लाभ किमान दहा लाख लोकांना होईल, असा दावा पालकमंत्री दाद भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यानिमित्त नाशिकला येत असल्याने जास्तीत जास्त लोकांची गर्दी जमवण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर मैदानावर सुरू असलेल्या कामकाजाची पाहणीही पालकमंत्री भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केली.

यासंदर्भात दादा भुसे यांच्या उपस्थितीत प्रशासनाची आढावा बैठक झाली. जिल्ह्यात आठ लाख ९१ हजार ३४० पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात आला. किमान १० लाख लाभार्थी होणे अपेक्षित आहे. ‘शासन आपल्या दारी’ योजनेची माहिती ग्रामस्थांना व्हावी, यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत शासकीय अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

‘शासन आपल्या दारी’साठी असलेल्या लाभार्थ्यांना एस. टी. महामंडळाच्या बसच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी आणले जाणार आहे. या लाभार्थ्यांना आणणे व परत पोचही केले जाणार असल्याने त्यासंदर्भात स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन करावा. त्याचप्रमाणे, ज्या पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांमुळे लाभ झाला, त्यांचे अनुभव कथन करणाऱ्या चित्रफिती तयार करून त्या कार्यक्रमस्थळी दाखवावव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार अॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे, माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT