Rajabhau Waje & Dada Bhuse
Rajabhau Waje & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse: दादा भुसे म्हणाले, वेळ आल्यावर सगळं बरोबर होईल!

Sampat Devgire

सिन्नर : माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्याशी एकनीष्ठ आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्या कन्येच्या साखरपुडयाला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, (Dada Bhuse) राधाकृष्ण विखे पाटील, (Radhakrishna Vikhe patil) खासदार हेमंत गोडसे (Hemant Gode) यांनी हजेरी लावली. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी विचारले, तुम्ही राजाभाऊ वाजे यांना न्यायला आले का?. त्यावर दादा भुसे म्हणाले, तसे नाही, मात्र वेळ आल्यावर सर्व बरोबर होईल. त्यांच्या या उत्तराने विचारणारे गोंधळात पडले. (Eknath Shinde supporter leaders present at Rajabhau Waje`s Programme)

वाजे यांच्या मुलीच्या साखरपुड्यास हजेरी लावली . बराच वेळ देऊन वाजे यांच्यासह कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी राजकीय गप्पांही झाल्याच. राजाभाऊ यांना तुमच्या गटात कधी घेऊन जाणार असे प्रश्न काही कार्यकर्त्यांनी केले. विशेषतः खासदार गोडसे व दादा भुसे यांनी त्याचे उत्तर द्यावे यासाठी कार्यकर्ते सतत त्यांना फूस देत होते. शेवटी या दोघांनीही मजेशीर उत्तरे देत गप्पाष्टकात रंगत आणली.

राजाभाऊ वाजे यांची कन्या मानसी हिचा साखरपुडा लोणी येथील धावणे कुटुंबातील मुलाशी झाला. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे, दादा भुसे, शालिनीताई विखे, खासदार गोडसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राजेंद्र पिपाडा यांसह नगर व नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची उपस्थिती होती.

त्यामुळे कार्यक्रम कौटुंबिक होता. माजी आमदार राजाभाऊ यांची राजकीय भूमिका आणि शिंदे गटातील नेत्यांच्या हजेरीमुळे भुसे व गोडसे यांना कार्यकर्त्यांच्या राजकीय प्रश्नांचा सामना करावा लागला. तुम्ही तिकडे. राजाभाऊ वाजे इकडे. त्यांना तुम्ही तुमच्या गटात कधी नेणार या प्रश्नावर, `काही घाई नाही. योग्य वेळी सगळे होईल` असे उत्तर भुसे यांनी दिले.

साखरपुडा होता. त्यात शिंदे गटाचे नेते येणार असल्याने पोलिसांनी त्याची आगाऊ माहिती होती. त्यामुळे या कार्यक्रमात काही विघ्न नको म्हणून पोलिसांनी श्री वाजे यांच्याशी देखील चर्चा केली. शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून तुम्ही काही निदर्शने, निषेध करणार आहात का? याची विचारणा केली होती. मात्र घरगुती समारंभ असल्याने असे काही करणार नाही, असे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT