Dada Bhuse News
Dada Bhuse News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दादा भुसेंच्या चिरंजीवांची लोकसभेची तयारी; भाजपचे भामरे काय करणार?

सरकारनामा ब्यूरो

Dada Bhuse News : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या मुलाचे नाशिकमध्ये भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भुसेंचे चिरंजीव अविष्कार भुसे हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार तर नाहीत ना? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

अविष्कार भुसे (avishkar bhuse ) यांच्यावर शिंदे गटाच्या युवासेनेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या युवासेनेच्या माध्यमातून आता ते थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत. अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे (Dhule), नाशिक (Nashik), मालेगावमध्ये बॅनर्स झळकले आहेत. शुभेच्छा देताना या बॅनर्सवर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स धुळे, नाशिक, मालेगावमध्ये झळकल्याने ते येणाऱ्या निवडणुकांच्या रिंगणात उतरणार तर नाहीत ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सध्या या मतदारसंघात भाजपचे डॉ.सुभाष भामरे (Subhash Bhamre) हे खासदार आहेत. अविष्कार भुसे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर भाजपचे भामरे काय करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) देखील राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र अविष्कार भुसे हे खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? की फक्त चर्चाच राहणार हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, सध्या राजकीय नेत्यांचे मुलं राजकारणात एन्ट्री करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे (Congress) नेते अशोक चव्हाणांची मुलगी राजकारणात सक्रिय झालेली पाहायला मिळाली. त्याआधी विजय वडेट्टीवारांच्या मुलीनेही राजकारणात एन्ट्री केली. त्यानंतर आता दादा भुसे यांचे चिरंजीव हे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT