Manikrao Kokate & Chhagan Bhujbal at Dubere siciety
Manikrao Kokate & Chhagan Bhujbal at Dubere siciety Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दमणगंगेचे पाणी वळवून सिन्नरचा दुष्काळ संपवणार!

Sampat Devgire

डुबेरे : दमणगंगा (Damanganga River) एकदरे कडवा देवनदी प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला आहे. या योजनेद्वारे ७ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी १६०० कोटी रुपये खर्च येईल. यातून सिन्नर (Sinner) तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

डुबेरे (ता. सिन्नर) येथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील सरकार सहकार क्षेत्राला उर्जितावस्था प्राप्तकरून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र बॅंका, पतसंस्था का बुडताहेत याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे असून पत आणि पतसंस्था दोन्ही टिकल्या पाहिजेत, संचालकांनी त्यासाठी कठोर राहिले पाहिजे असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मंत्री भुजबळ यांनी सहकाराचा अनेकांचा अनुभव चांगला नसताना डुबेरेच्या पतसंस्थेने केलेली प्रगती आणि जनतेच्या आर्थिक गरजा भगविण्यासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. संस्थेची घोडदौड अशीच सुरू राहो अशा सदिच्छाही त्यांनी दिल्या.

संचालकांची भूमिका महत्त्वाची

मंत्री पुढे भुजबळ म्हणाले, सहकारी संस्थांच्या बाबतीत कडक उन्हाळा आला असून अनेक बँका बुडाल्या आहेत. सहकारी बँकांवर अशी वेळ का येते याचा अभ्यास आणि आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. पत निर्माण करण्यासाठी पतसंस्थांनी मोठं योगदान दिलेले असते, या पतसंस्था टिकल्या पाहिजे यासाठी संचालक मंडळाने आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली पाहिजे. राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न असून यशस्वीपणे कारखाना चालविणाऱ्यांना ते चालविण्यास संधी देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.

कार्यक्रमाला आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, संस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारूंगसे, सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अंबादास वाजे, सरपंच अर्जुन वाजे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT