Ahmadnagar Politics भाजपा खासदार सुजय विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच त्यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. मैं हू डॉन... गाण्यावर ते थिरकत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार शिवाजी कर्डिले हे देखील आहे. कार्यकर्ते देखील त्यांच्याभोवजी जल्लोष करत या दोघांना खांद्यावर घेऊन नाचत आहेत.
नगर दक्षिणमधून भाजपचा उमेदवार कोण? याचे टेन्शन, यातच वरिष्ठ नेत्यांच्या जोर बैठका सुरू असतानाच खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) मात्र, संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मैं हू डॉन... या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या कृतीवर स्वपक्षीयांबरोबर विरोधक नाक मुरडत आहेत. पण, खासदार विखेंनी यावर मार्मिक शब्दात टिप्पणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय खासदार सुजय विखे हे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचा शेवट 'मैं हू डॉन..', या गाण्याने होत आहे. या गाण्यावर खासदार विखे ठेका धरताना दिसत आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे? असे विचारल्यावर खासदार विखे खळखळून हसले.'मी काही डॉन वैगेरे नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे', असे सांगून माझा आवडता अभिनेता अभिताभ बच्चन असल्याचे ते म्हणाले.
खासदार विखे म्हणाले, "अरे, कमालच झाली! माणसाने एन्जॉय देखील करायचे की नाही? या गाण्यातील डान्स स्टेप फेमस झालेली आहे. त्यामुळे त्यावर डान्स करतो. तुम्ही मला एखादे गाणं सांगा. मी गाणं बदलून घेतो. असे काही कोणाला इशारा नाही आहे. जनतेचे प्रेम आहे. कार्यकर्ते म्हणतात, ते गाणं वाजवा म्हणून ते वाजले जाते.
अमिताभ बच्चन हे माझे आवडते कलाकार आहे. मूळ म्हणजे, मैं हू डॉन.., असलेल्या गाण्याचा चित्रपट मला आवडतो. मनापासून चित्रपट आणि गाणं देखील आवडते, म्हणून त्यावर डान्स होतो. मला कोणालाही इशारा द्यायचा नाही. मी फार सामान्य माणूस आहे. मी काही डॉन वैगेरे काही नाही. जे डॉन असतील, त्यांना ते गाणं सुट होईल. माझ्याशी हे गाणं लिंकअप करण्याची गरज नाही.
जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठवड्याभरापासून खासदार सुजय विखे यांचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमांसाठी मराठी-हिंदी चित्रपटातील सेलिब्रेटींची रेलचेल सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. आता गायक-संगीतकार अजय-अतुल यांचा म्युझिकल नाईटचे रविवारी (ता. 10) नगरमध्ये आयोजन केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.