Sangram Jagtap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Jagtap : शिर्डीतील 'नवसंकल्पा'पूर्वीच अजितदादांच्या लाडक्या शिलेदाराचा हिंदुत्वाचा हुंकार

DCM Ajit Pawar NCP MLA Sangram Jagtap Hindutva Karjat Siddhatek : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी इथं नवसंकल्प शिबिराच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेले आमदार संग्राम जगताप चर्चेत आहेत.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : अजितदादांचा लाडका शिलेदार तिसऱ्यांना आमदार झाला. मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार, अशी चर्चा असतानाच संधी हुकली. आता मात्र राज्य पातळीवर नेतृत्व करणाच्या संधीच्या शोधत असलेले आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला आहे.

शिर्डीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्यापासून दोन दिवसांचे नवसंकल्प शिबिर होत आहे. या शिबिराच्या तोंडावर अजितदादांच्या लाडक्या शिलेदारानं हिंदुत्वाचा भरलेला हुंकाराचे पडसाद शिबिरात उमटणार, अशी चर्चा आहे.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक (ता. कर्जत) येथील मंदिराच्या महाद्वाराशेजारील एक बांधकाम सकल हिंदू (Hindu) समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी पाडले. कर्जत तालुका सकल हिंदू समाजाने कर्जतच्या सिद्धटेक, इथं दुचाकी रॅली काढली. यात अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप, श्रीरामपूरमधील सागर बेग सहभागी झाले होते. सिद्धटेक मंदिर प्रवेशद्वारासमोरचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची मागणी करत असतानाच, आक्रमक कार्यकर्त्यांनी ते हटवले. त्यामुळे काही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला इथं आव्हान करताना, ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे असतील, तिथे प्रशासनाने कारवाई करावी असं आवाहन केलं. अशा अतिक्रमणांवर प्रशासनानं कारवाई न केल्यास, अन्यथा आम्हाला ते स्वतःहून काढावे लागतील, असा इशारा दिला. जिल्ह्यात काही गटांकडून हिंदूंच्या धार्मिक स्थळांजवळ, अशा प्रकारचे अनधिकृत कृत्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. ते धार्मिक भावना दुखावणारे आहेत. प्रशासनाने कारवाई न केल्याने ते बांधकाम हटवावे लागले. यापुढे असे बांधकाम जर कोठे आढळल्यास त्यावरही कारवाई अपेक्षित आहे, असेही आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले.

शिंदे अन् पवार यांच्या बालेकिल्ल्यात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी इथं दोन दिवसांचे नवसंकल्प शिबिर उद्यापासून सुरू होत आहे. त्या शिबिराच्या तोंडावर आमदार संग्राम जगताप हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहे. विशेष म्हणजे, आमदार जगताप ज्या अतिक्रमणावर आक्रमक झाले, तो मतदारसंघ भाजपचे विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार या दोघा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धींचा आहे.

अजितदादांशी एकनिष्ठ

आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावरच निवडून आले आहेत. राष्ट्रवादी एकसंघ होती आणि त्यानंतर अजितदादा वेगळे झाले. या सर्व घडामोडींत संग्राम जगताप यांचा अजितदादांबरोबर राहिले. त्यामुळे ते अजितदादांचे लाडके आमदार असल्याचे देखील बोलले जातात. याची परिचिती, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांनी अहिल्यानगर शहर मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर केला होता.

नवसंकल्प शिबिरात पडसाद उमटणार?

संग्राम जगताप यांच्या आमदारकीची तिसरी टर्म आहे. या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. तशी चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. परंतु संधी हुकली. आता आमदार जगताप यांनी राज्य पातळीवर काम करण्याची तयारी सुरू केली आहे. तशी मध्यतंरी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या सुरवातीसाठी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतल्याचे दिसते. सिद्धटेक (ता. कर्जत) इथल्या अतिक्रमणाविरोधात मोर्चात ते त्याच रूपात दिसले. आमदार संग्राम जगताप यांच्या या हिंदुत्वाच्या मुद्याकडे त्यांचे नेते अजित पवार कसं पाहतात, याची नवसंकल्प शिबिराच्या तोंडावर चर्चेला तोंड फुटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT