<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>

Ajit Pawar

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

एसटीत नवीन भरती सुरु केली तर... अजितदादांचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप (ST Strike) पुकारला आहे. ज्या मागण्यांसाठी संप केला. त्यातील पगारवाढ आम्ही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली आहे. विलिनीकरणबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीत जो निर्णय होईल, त्यावर न्यायालय निर्णय देईल. त्या मुळे संपाबाबत जास्त ताणू नये, जर आम्ही नवीन भरती सुरू केली तर काय होईल? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) एसटी कर्मचाऱ्यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला.

अजित पवार आज (ता. १७) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrab Patil), खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राउत उपस्थित होते. पवार म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील जनतेची नाळ आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी एसटीने प्रवास करतात. दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यांच्या पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. आता संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतला पाहिजे.

एसटी आधीच तोट्यात असून आणखी तोट्यात जाऊ नये, म्हणून पाउले उचलावी लागतील. नवीन भरती प्रक्रिया सुरू केली तर कर्मचाऱ्यांनी मोठी अडचण होईल, असा इशारा पवार यांनी दिला. प्रवासी नागरिकही आपलेच आहेत आणि एसटी कामगार देखील आपलेच आहेत. माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे की, आता कामावर येऊन तुम्ही एसटी सुरू केली पाहिजे, असे आवाहनही पवार यांनी केले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आतापर्यंत अनेकदा कामगारांना मूभा दिली. मात्र, आता त्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये. आता कामावर येऊन सुरुवात केली पाहिजे. एसटी चालवताना काही कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली जाते. एसटीचे नुकसान झाले तर ते जनतेचच नुकसान आहे. त्यातून कोण काय मिळवते, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. उद्या मेस्मा कायद्यासंदर्भात काही निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेऊन तुटेपर्यंत ताणले तर मागच्या काळामध्ये काय अवस्था झाली हे आपण बघितले. याबद्दल पण मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. टोकाची वेळ येऊ नये, अशी विनंती पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT