Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

फडणवीससाहेब थोडा ‘जल आक्रोश’ धुळ्यातही करा!

Sampat Devgire

धुळे : महापालिकेच्या (Dhule corporation) निवडणुकीत भाजपला (BJP) मते देणाऱ्या धुळेकरांसाठी फडणवीस साहेब (Devendra Fadanvis) धुळ्यातही ‘जल आक्रोश’ करायला या असे आवाहन शिवसेनेने (Shivsena) केले आहे. पाणीप्रश्‍नी शिवसेनेने भाजपला (BJP) यातून पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. (Devendra Fadanvis shall come Dhule for water agaitaion-sd67)

तीव्र उन्हाळ्यात धुळेकर नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्रोत भरलेले असताना नवीन सात जलकुंभ व साडेतीनशे किलोमीटर पाइपलाइन टाकून झाली तरी ही स्थिती आहे. नागरिकांना बारा ते पंधरा दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. मनपा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने तुमच्यासह गिरीश महाजन, जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे अशा सर्वच नेत्यांनी प्रचारात विकासाचे स्वप्न दाखविले होते.

तुमचा श्वास रोखून भाषण करण्याचा आक्रोश पाहून भोळेभाबडे धुळेकर बळी पडून धुळ्याला रोज पाणी मिळेल या आशेवर भाजपला मनपाची एकहाती सत्ता दिली. मात्र तीन वर्ष झाले तरीही नागरिकांच्या घशाला कोरडच आहे. धुळेकर नागरिक भाजपला मत देण्याचे पाप फेडत आहेत की काय असे शिवसेनेने म्हटले आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत वेळेवर पाणीपुरवठा होतो आहे असे एकही सत्ताधारी सांगण्याची हिंमत दाखवू शकत नाही.

धुळ्यातही मोर्चा काढा

औरंगाबाद येथील जल आक्रोश मोर्चा रोजंदारीवर आणलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर जोरात झाला त्यामुळे तुम्ही धुळ्यात येऊन धुळेकर नागरिकांसाठी असाच प्रचंड मोठा मोर्चा काढा. नैतिक अधिष्ठान गमावल्या मुळे भाजपचे मनपातील सत्ताधारी तुमच्या जलआक्रोश मोर्चात सामील झाले नाही तरी चालेल. येथेही भाडोत्री कार्यकर्ते आणण्याची देखील तुम्हाला आवश्यकता नाही. आम्ही धुळेकर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहू.

त्यामुळे आपण आता धुळ्यात या व खोट्या आश्वासनांना बळी पडलेल्या धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झालेल्या धुळेकरांचा घसा ओला करा असे शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख सतीश महाले, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, संघटक गुलाब माळी, राजेश पटवारी, देवा लोणारी, संजय वाल्हे, समन्वयक भरत मोरे, नितीन शिरसाट, बबन थोरात आदींची या पत्रकात नावे आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT