Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देशाच्या इतिहासासोबत छेडछाड, मुघलांवर 17 पाने, शिवाजी महाराजांवर फक्त एक पॅरेग्राफ ; फडणवीसांनी सगळच काढलं...

Devendra Fadnavis On Tipu Sultan controversy : हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतान याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांचा त्यावरुन चांगलाच समाचार घेतला.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : मालेगावच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यापार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत तो फोटो काढण्याचा इशारा दिला होता. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाी याविषयावर माध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सकपाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली होती. टिपू सूलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानलं पाहीजे असं वक्तव्य सपकाळ यांनी केल्याने मोठा वाद उफाळला. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या वक्तव्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीपू सुलतान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरुन विरोधकांना चांगलच सुनावलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव आणि कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी उत्तर दिलं. आपल्याला वर्षानुवर्ष खोटा इतिहास शिकावला घेल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टीपू सुलतान व छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणे दुर्देवी असल्याचं म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली. त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टीपू सुलतान महान राजे होते. पण हे कधी सांगितलं नाही की, ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारा टीपू सुलतान होते. हे आम्हाला शिकवलं गेलं नाही. टीपू सुलतान इंग्रजांशी लढले पण कशासाठी लढले तर स्वत:चे राज्य वाचविण्यासाठी लढले. या गोष्टी हळू हळू समोर येऊ लागल्या आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

फडणवीस पुढे म्हणाले, आता खरा इतिहास सापडतो आहे. वर्षानुवर्ष या देशामध्ये सरकारने सत्तर वर्ष एनसीआरटीच्या पुस्तकात मोगली साम्राज्याला १७ पाने दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक पॅरेग्राफ होता. आता मोदी सरकारने त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी इतिहासाला एनसीआरटीमध्ये २० पाने दिल्याचे फडणवीसांनी सांगितले.

एनसीआरटीच्या पुस्तकात आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्यावर २० पाने आहेत. हाच इतिहास जर आम्हाला तेव्हा शिकविला गेला असता तर आज मुस्लिमांमध्ये औरंगजेब हिरो ठरला नसता. एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपल्याला खरा इतिहास शिकवला गेला नाही असा आरोप फडणवीस यांनी केला. आपल्या देशात मुस्लिम देखील राष्ट्रभक्त आहेत, त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाही. परंतू जे लोक देशाच्या विरोधकांना, या देशाच्या आक्रमणकऱ्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरोधात आम्ही लढाई करुच असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT