Hussain Dalwai & Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hussain Dalvai Politics: आमदार देवयानी फरांदे यांचा आरोप, हुसेन दलवाई यांना दंगल घडवायची होती का?

Devyani Pharande;MLA Farande's counterattack on Congress's Hussain Dalwai -सात पीर दर्गा अतिक्रमण कारवाईचा वाद पुन्हा उफाळला, हुसेन दलवाई आणि आमदार फरांदे यांचे परस्परांवर टीकास्त्र

Sampat Devgire

Devyani Pharande News: शहरातील सात पीर दर्गा महापालिकेने कारवाई करून पाडला. त्यामुळे शहरात दंगल झाली. या दंगलीला जबाबदार कोण यावरून समर्थक आणि विरोधक दोघेही एकमेकांशी भिडले आहेत. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी काल नाशिक शहराला भेट दिली. त्यांना सात पीर दर्गा येथे भेट देण्यास जायचे होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सात पीर दर्गाच्या वादग्रस्त ठिकाणी जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले. त्यामुळे संताप्त दलवाई यांनी पोलीस आणि सत्ताधारी भाजपवर टीका केली होती.

संबंधित प्रार्थना स्थळ वादग्रस्त नाही. हे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. या दर्गा विश्वस्त मंडळावर हिंदू समाजाचे विश्वस्त देखील आहेत. हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचा दावा त्यांनी हुसेन दलवाई यांनी केला होता. त्यावरून भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उत्तर दिले आहे.

यासंदर्भात शहरातील स्थानिक आमदार यांनी संबंधित दर्ग्याला थडगे असे संबोधले. वारंवार आमदार फरांदे यांनी चिथामणीखोर भाषण केली. या दर्ग्याचा त्यांनी वारंवार अपमान केला आहे. आमदार यांच्यामुळेच वातावरण बिघडले असून दबावापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप दलवाई यांनी केला.

माजी खासदार दलवाई यांच्या आरोपाला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील तेवढ्याच प्रकर्षाने उत्तर दिले आहे. कलवा यांना संबंधित ठिकाणी जाण्याचे कारणच काय? असा प्रश्न त्यांनी केला. दलवाई यांना येथील वातावरण बिघडवायचे होते. न्यायालयाच्या आदेशाने संबंधित दर्गा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडला आहे. शहर शांत असताना दलवाई यांना समाजाची माती भडकवायची होती का? चा प्रश्न त्यांनी केला.

एकंदरच सात पीर दर्गा आणि त्यानंतर महापालिका आणि पोलिसांनी केलेली कारवाई हा अद्यापही चर्चेचा विषय आहे. यावरून विविध संघटनांनी महापालिका तसेच पोलिसांवर टीका केली आहे. हा वाद अद्यापही क्षमण्याची चिन्हे नाहीत. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवर आरोप करीत असल्याने हा वाद नव्याने उफाळून आल्याचे चित्र आहे.

संबंधित दर्ग्याचे बांधकाम पाडल्यानंतर शहरात १६ एप्रिलला दंगल झाली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या विविध पदाधिकाऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत चाळीसहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. यांनी केलेली ही कारवाई सोडाची असल्याचा आरोप आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT