Devyani Pharande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devyani Phrande Politics: आमदार फरांदे नाशिकच्या रस्त्यांचे काढले वाघाडे, शासनाने मागितला नाशिक महापालिकेकडे अहवाल!

Devyani Phrande; Nashik Municipal Corporation MLA Devyani Farande raises objections in the Legislative Assembly-महापालिकेतील अधिकारी, ठेकेदारांच्या कारस्थानातून रस्त्यांची गुणवत्ता ढासळली

Sampat Devgire

Devyani Phrande News: नाशिक शहरातील रस्ते आणि त्याच्या दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च होतात. त्यामध्ये अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात मिली भगत आहे. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड खड्डे आणि दुरावस्था अशी स्थिती आहे. यावर थेट विधिमंडळात चर्चा झाली.

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर चांगलेच टीकास्त्र सोडण्यात आले. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत निकष बाजूला ठेवून अधिकारी आणि कंत्राटदार यांचे साटेलोटे निर्माण झाले आहे, असा आरोप करण्यात आला.

या चर्चेबाबत विधिमंडळातील पिठासीन नाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामकाज आणि दुरावस्थेबाबत महापालिकेकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल आल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यावर निवेदन करती. पालिकेने अहवाल पाठविण्यास कसूर केल्यास कार्यासन अधिकारी मो. क. बागवान याबाबत कारवाई करणार आहेत.

इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार रस्त्याचे बांधकाम केल्यास किमान वीस वर्ष ते रस्ते टिकले पाहिजेत. शहरातील रस्ते मात्र बांधल्यावर लगेचच नादुरुस्त होतात. खड्डे पडतात. ते बांधल्यानंतर त्याची किमान पाच वर्ष आम्ही कंत्राटदाराकडे असते. मात्र त्याबाबत अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने शहरातील रस्त्यांच्या कामावर होणाऱ्या सर्व खर्च वाया जातो अशी स्थिती आहे.

आमदार फरांदे यांनी याबाबत शासनाचे लक्ष वेधले आहे. महापालिकेचा गुणवत्ता नियंत्रण विभाग अस्तित्वात आहे. मात्र हे अधिकारी कधीही प्रत्यक्ष कार्यस्थळी जात नाहीत. आपल्याला बसूनच सोयीनुसार अहवाल दिले जातात. त्यामुळे महापालिकेच्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून याबाबत प्रशासन आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड (डी.ए.पी.) पाच वर्ष करताना त्यात अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात साटेलोटे झाल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला. नादुरुस्त रस्त्यांबाबत ठेकेदारांवर कोणतीही जबाबदारी निश्चित केली जात नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आमदार पर्यंत यांनी केली. त्यावर पिठाचें अधिकाऱ्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT