Ahmednagar News : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टिका करताना देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार म्हणजे, शरद पवार आहे, असे म्हटले. अमित शाह यांच्या या टिकेचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
अमित शाह यांच्या या टिकेची 'री ओढली' आहे, ती म्हणजे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी! विशेष म्हणजे, अजित पवार अजून अमित शाह यांच्या टिकेवर अजून काहीच बोललेले नाहीत.
भाजप नेते अमित शाह यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भ्रष्टाचारांचे सरदार, असे म्हटले आहे. अमित शहा बोलल्यानंतर मी त्यावर बोलणं योग्य नाही. परंतु अमित शाह काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रियेचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहाण्याचे ठरणार आहे. धनंजय मुंडे शिर्डी येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साई दरबारी आले होते. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खूप वर्षानंतर मुंडे साई दरबारी आले होते.
धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने त्यांचे राजकीय गुरू गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला. गुरू आणि मोठे बंधू म्हणून अजितदादांकडे पाहतो. इथपर्यंतच्या वाटचालीत त्यांचे मोठे योगदान असून माझे खरे गुरू अजितदादाच आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
महायुतीमधील कोणताच पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार नाही. आम्ही एकत्र आहोत, आणि एकत्रच निवडणुकीला समोरे जाणार, यात तीळमात्र शंका नाही. परंतु भाजप त्यांच्या जागासंदर्भात निर्णय घेईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. विशाळ गडाच्या प्रकरणानंतर शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी कोणतही वक्तव्य केलेले नाही. यामुळे आमचा उपयोग फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केला आणि वाऱ्यावर सोडून दिले, हे मुस्लिम समाजाले समजले आहे.
धारावी अदानींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करतेय, असा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार होत आहे. यावर धनंजय मुंडे म्हणाले, "मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला काम यांनीच दिले होते. ते रद्द कुणाच्या काळात झालं आणि अदानींना दिलं याचा अभ्यास माध्यमांनी करावा.धरावीच्या पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उध्दव ठाकरेंनी उत्तर द्यावं. उद्धव ठाकरे फक्त आरोप करतात".
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.