Dhangar Protesters Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhangar ST Reservation : पुन्हा तोच घोळ ! जरांगेंनंतर धनगर आरक्षणातही मुदतीचे कन्फ्यूजन ? सरकार म्हणतं...

Ram Shinde In Chaundi : सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न मार्गी लागणार

राजेंद्र त्रिमुखे

Maharashtra Political News : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली असली तर सरकारच्या वतीने २ जानेवारी ही तारीख सांगितली जाते. हेच आता धनगर आंदोलकांबाबतही घडले आहे. चौंडी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण माजी मंत्री राम शिंदे यांच्या शिष्टाईने उपोषण स्थगित केले आहे.

या वेळी शिंदेंनी एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत तीन महिन्यांत समितीचा अहवाल येईल, असे सांगितले आहे. आंदोलकांनी मात्र दीड महिन्यातच अहवाल देण्याची मागणी करत पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. परिणामी आंदोलन स्थगित झाले असले तरी मुदतीचे कन्फ्यूजन निर्माण झाले आहे.

यशवंत सेनेची भूमिका

शासनाने दिलेला तीन महिन्यांचा कालावधी हा जास्त आहे, असा आक्षेर यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच लवकरात लवकर हा अहवाल येऊन शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी दोडतलेंनी केली आहे. यावर समितीला तीन महिन्यांचा कालावधी दिला असला तरी तत्पूर्वीच अहवाल शासनाला सादर करण्याचे समितीला सांगण्यात येईल, असे शिंदेंनी आश्वासित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीड महिन्याचीच मुदत

आमदार शिंदेंच्या शिष्टाईनंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. यानंतर यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले आणि आंदोलक म्हणाले, 'समितीच्या अभ्यासासाठी आणि निर्णयासाठी सरकारने तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. मात्र, आम्ही शासनाला जास्तीत जास्त दीड महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा. त्यानुसार शासनाने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेशाचा निर्णय घ्यावा, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे दीड महिन्यात समितीने अहवाल सादर करून शासनाने निर्णय न घेतल्यास यशवंत सेना पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे.'

सर्वांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार

सरकारच्या वतीने आंदोलकांशी बोलणी करण्यास आलेले माजी मंत्री राम शिंदे यांनी 'महायुती सरकार हे सर्व समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. राज्यात ज्या ठिकाणी आंदोलने सुरू आहेत, त्यावर तोडगा काढण्याचे काम सरकार करत आहेत. यामुळे अनेक समाजाच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचललेली आहेत. आज त्याच पद्धतीने धनगर समाजासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. चौंडीत सुरू असलेले आंदोलन थांबले आहे,' असेही शिंदेंनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT