Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dharangaon Bazar Samiti Election : गुलाबराव पाटलांची होमपीचमध्ये जोरदार बॅटींग ; धरणगावात आठ जागांवर..

MLA Gulabrao Patil Dharangaon Bazar Samiti Election : १८ पैकी तब्बल ८ जागांवर विजय मिळाला असून ९ जागावर आघाडी

कैसाल शिंदे

MLA Gulabrao Patil Dharangaon Bazar Samiti Election : धरणगाव बाजार समिती मतदार संघात जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलची आघाडी आहे. १८ पैकी तब्बल ८ जागांवर विजय मिळाला असून ९ जागावर आघाडी आहे. महाविकास आघाडी केवळ दोन जागेवर आघाडीवर आहे.

या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा गट तसेच भाजपही शिंदे गटासोबत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव बाजार समितीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. या ठिकाणी जिल्हा बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस संजय पवार यांनी मंत्री पाटील यांच्या पॅनलला साथ दिली आहे.

आज झालेल्या मतमोजणीत हमाल मापाडी संघातून एक तर ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी मतदार संघातील दोन जागा मंत्री पाटील यांच्या सहकार गटाला मिळाल्या आहेत. तर इतर गटातील तब्बल ९ उमेदवार आघाडीवर आहेत.१८ पैकी १६ जागावर पाटील यांनी ताबा मिळविला आहे.

महाविकास आघाडी केवळ दोन मतदार संघात आघाडीवर आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट व कॉंगेसच महाविकास आघाडी असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर हे त्यांचे नेतृत्व करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 6 पैकी 4 बाजार समित्यांमध्ये भाजप-शिंदे गटाला सर्वाधिक जागांवर यश मिळालं आहे. पण दोन बाजार समितीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. गिरीश महाजन यांचं होमग्राउंड असलेल्या जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. पण रावेरमध्ये भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

भुसावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. या विजयामुळे भुसावळ मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

भुसावळ बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी बाजी मारली आहे. १८ पैकी तब्बल १५ जागावर त्यांनी विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे माजी आमदार संतोष चौधरी यांना केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT