CM Devendra Fadnavis reaction to Dheerajsinh Rajput murder Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dheerajsinh Rajput Murder : धीरजसिंह हत्या प्रकरणात जमाव संतप्त; पडळकरांचा फडणवीसांना फोन, CM म्हणाले, ‘ही प्रवृत्ती ठेचणार’

Padalkar calls Fadnavis over Dheerajsinh murder: पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर संतप्त युवकांचा जमाव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे, रात्री उशिरा धीरजसिंह राजपूत यांच्यावर अंत्यसंस्कार.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Murder Case: धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याचा मारेकऱ्यांविरोधात युवक-तरुणांचा जमाव आपला संताप व्यक्त करत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर जमला होता. पाच तास ते सहा तास हा जमावाचे पुढे रात्रीचे सात वाजल्या नंतर सभेत रुपांतरीत झाला. सभेत माथी गरम होतील, अशी भाषणे झाली.

सभा शेवटच्या टप्प्यात येताच, आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवरून संपर्क साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे सरकार तुमच्या मनाप्रमाणे कारवाई करत आहे. ही प्रवृत्ती ठेचणार आहे, असे आश्वासन दिले अन् संतप्त युवकांचा जमाव एकदम शांत झाला. पुढे धीरजसिंह याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार उरकरण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोबाईलवरून जमावाशी संवाद साधताना, धीरजसिंह याच्या हत्येत प्रवृत्ती ठेचणार असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, "धीरजसिंह याच्या हत्येप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहाता सरकार सकारात्मक असून, गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत काम करणार आहे. तीन ते चार वकिलांशी चर्चा सुरू असून, हा खटला उच्च न्यायालयाकडे शिफारस करून जलदगतीने चालवण्यासाठी तयारी सुरू आहे."

ही प्रवृत्ती आहे. तिला ठेचावीच लागणार. तुमचा आक्रोश बरोबर आहे. सरकार तुमच्या मनाप्रमाणे या हत्येप्रकरणात कारवाई करेल, आता आंदोलन मागे घेऊन, अंत्यसंस्कार उरकून घ्यावे, अशी शेवटी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली.

आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी हत्येतील मारेकऱ्यांसह घटना झालेल्या विशिष्ट समाजाच्या अतिक्रमणांकडे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री यांनी ड्यूज पाहून, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन सुचनांप्रमाणे कारवाई केली जाईल. यात कोणालाच सोडणार नाही, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आमदार पडळकरांनी संवाद साधून दिल्याने, संतापलेला जमाव एकदम शांत झाला. धीरजसिंह यातचा मृतदेह पुढे अंत्यसंस्काराला नेताच, जमाव पांगला. मात्र हा जमाव दुपारी चार वाजल्यापासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर जमल्यानंतर आक्रमक होता.

रस्त्याने विशिष्ट समाज दिसताच, तो आक्रमक होऊन, शिवराळपद्धतीने टार्गेट करत होता. पोलिस बंदोबस्ताच्या भूमिकेत होते. परिस्थिती नियंत्रणात राहिल याची काळजी घेत होते. जमावाला काबूत आणण्याची वेळ आल्यास, तसे सज्ज होते. पण संयम बाळगून होते.

अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले. घटनेशी संबंध नसलेल्या विशिष्ट समाजातील वाटसरूंना जमावाने टार्गेट केले. वाहनधारकांच्या दिशेने शिवराळ, विशिष्ट समाजाच्या उल्लेख करणाऱ्या भाषेचा वापर झाला. जमावसमोर कोणाचेच काही चालत नाही. तसेच संबंधित वाटसरू संयम दाखवत, सहन करत पुढे निघून जात होते.

याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी कमालाची संयम दाखवला. सर्व पाहत होते. वेळाच प्रसंग उद्भवू नये म्हणून जमावाला रस्त्यावरून मागे नेत होते. यात काहीअंशी यश यायचे पण युवकांचा-तरुणांचा जमाव पुन्हा रस्त्यावर येत होता.

आमदार संग्राम जगताप, भाजप आमदार अक्षय कर्डिले, आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्रामबापू भंडारे येताच सभेला सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवरून संपर्क साधून, आश्वासन मिळताच जमाव पांगला अन् धीरजसिंह याच्यावर अंतिम संस्कार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT