Sangram Bhandare Mukundnagar statement Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangram Bhandare Maharaj : ‘टिळ्यामुळे हत्या’च्या दाव्यानंतर मुकुंदनगरबाबत संग्रामबापू भंडारे महाराजांचा मोठा इशारा

Sangram Bhandare on Mukundnagar controversy : धीरजसिंह राजपूत हत्या प्रकरण तापले; दशक्रियेनंतर भगवे झेंडे घेऊन मुकुंदनगरमध्ये जाण्याचे वक्तव्य, आरोपींच्या पलायनावरही सवाल

Pradeep Pendhare

Ahilyanagar Murder Case: धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याची हत्या मुकुंदनगर मुस्लिम बहुल भागात कपाळाला टिळा लावल्याने झाल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले यांनी कालच्या पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील सभेत केला.

या दाव्याचा धागा पकडत संग्राम बापू भंडारे महाराज यांनी धीरजसिंह याचा दशक्रिया विधी होऊ द्या, आपण हातात भगवे झेंडे, कपाळाला टिळा लावून मुकुंदनगरची गल्ली पिंजून काढू, असा इशारा दिला.

धीरजसिंह याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून उत्तरीय तापसणीनंतर अहिल्यानगर शहरात काल रात्री आठ वाजता आणण्यात आणला. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील चौकात जमलेल्या युवक-तरुणांची तत्पूर्वी सभेला राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले आणि संग्रामबापू भंडारे महाराज समोरे गेले.

संग्रामबापू भंडारे महाराज यांनी, मुकुंदनगर भागात झालेल्या या हत्येवरून जोरदार निशाणा साधला. धीरजसिंह याचा दशक्रिया होऊ द्या. आपण हातात भगवे झेंडे, कपाळाला टिळा लावून मुकुंदनगरमधील गल्लीबोळ पिंजून काढणार. मुकुंदनगरमध्ये पाकिस्तानमध्ये जरी असते, तर तिथे घुसण्याची आमच्यात हिंमत आहे, असा घणाघात केला.

मुकुंदनगरला टार्गेट करू नका, असे मी या घटनेनंतर ऐकत आलो आहे. धीरजसिंह याची ज्यापद्धतीने हत्या झाली, तेव्हापासून मी अस्वस्थ आहे. पण दशक्रिया विधी झाल्यानंतर आपण संग्राम जगताप (Sangram Jagtap), अक्षय कर्डिले यांच्याबरोबर भगवे झेंडे, कपाळा टिळा लावून, मुकुंदनगरमध्ये जाणार आहे. धीरजसिंह याला हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे संग्रामबापू भंडारे यांनी म्हटले.

जुन्या औरंगाबादकडे आरोपींचे पलायन

हत्येची घटना घडल्यानंतर आरोपी हे जुन्या औरंगाबादला जातात. तिथे कोण बसले हे सर्वांना माहिती आहे. त्या नालायकाने आता अहिल्यानगरमध्ये येऊनच दाखवावे, असे कोणाचेही नाव न घेता, सूचकपणे संग्रामबापू भंडारे यांनी इशारा दिला. तिथून पुढे ही पोरे थेट हैदराबादला जातात, ते कोणामुळे जात आहेत? याचाही उलगडा व्हावा, अशी मागणी संग्रामबापू यांनी केली.

योगींचा बुलडोझर पॅटर्न संग्रामभैय्या राबवू शकतात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एक है तो, सेफ है', असे म्हणत या प्रवृत्तीविरोधात एकत्र यावेच लागेल. योगींचा बुलडोझर पॅटर्न हा महाराष्ट्रात संग्रामभैय्याच राबवू शकतात.

त्याशिवाय महाराष्ट्रातील हिंदू सुरक्षित होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील योगी हा संग्राम भैय्यांच्या रूपात पाहू आणि जिहाद कायमचा संपवून टाकू. धीरजसिंह याला खरी श्रद्धांजली ही जिहादींवर बहिष्कार घालूनच मिळेल. यांच्याशी संबंधित ठेवायचाच नाही, असे संग्रामबापू भंडारे यांनी म्हटले.

धीरजसिंह याची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा

धीरजसिंह याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात इन कॅमेरा व्हावी, अशी त्याची कुटुंबीयांनी मागणी केली होती. नियमानुसार तसे करता येत नव्हते. अहिल्यानगर पोलिसांनी विशेष शिफारस करत उत्तरीय तपासणी इन कॅमेरा करून घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT