Dheerajsinh Rajput case bulldozer action Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dheerajsinh Rajput Case : धीरजसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आरोपींच्या घरांवर अतिक्रमणाच्या नोटिसा; आता ‘बुलडोझर’ चालणार?

Dheerajsinh Rajput case encroachment notice: नागरदेवळे ग्रामपंचायतीची कारवाई; अतिक्रमण हटविण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही, पुढील प्रशासकीय कारवाईकडे अहिल्यानगरचे लक्ष.

Pradeep Pendhare

Bulldozer action against accused houses: अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याच्या मृत्यूप्रकरणी आता प्रशासकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत.

नागरदेवळे ग्रामपंचायतीने या प्रकरणातील आरोपी म्हणून उल्लेख केलेल्या मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या घरांवर अतिक्रमणासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईनंतर संबंधित अतिक्रमणांवर बुलडोझर चालविला जाणार का? याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे.

धीरजसिंह याच्यावर मुकुंदनगर या मुस्लिम (Muslim) बहुल भागात जीवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नागरदेवळे ग्रामपंचायतीने (Garm Panchayat) मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या घरांवर नोटिसा लावल्या आहेत. संबंधित बांधकाम अतिक्रमणाच्या जागेवर असल्याचे ग्रामपंचायतीच्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

नोटिसा बजावल्यानंतर संबंधित अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून केली जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र, बुलडोझर कारवाईबाबत ग्रामपंचायतीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

धीरजसिंह याच्या मृत्यूनंतर हल्ल्यातील आरोपींच्या घरांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांसह आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांनीही या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती.

त्यानंतर नागरदेवळे ग्रामपंचायतीकडून संबंधित घरांना नोटिसा देण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अतिक्रमण असल्यास त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया कायदेशीर आणि प्रशासकीय नियमांनुसारच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नोटिशीनंतर पुढील कारवाईचे स्वरूप काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

अक्षय कर्डिलेंचे संतप्त विधान चर्चेत

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी केलेले संतप्त विधानही चर्चेत आले आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करताना कर्डिले यांनी, आरोपींना केवळ गजाआड करण्याऐवजी पकडताच त्यांचे "मुंडके छाटले पाहिजे", अशा आशयाचे विधान केले होते.

वक्तव्यात मुस्लिम समाजाचा उल्लेख

या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः या वक्तव्यात मुस्लिम समाजाचा उल्लेख केल्याने त्यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कायदा हातात घेण्याऐवजी दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरते.

दोन दिवसांपासून शहर बंदचे आवाहन

धीरजसिंह याच्या मृत्यूनंतर अहिल्यानगर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी सलग दोन दिवस शहर बंदचे आवाहन केले आहे. आजही काही कार्यकर्ते शहरात फिरून बंदचे आवाहन करत असल्याचे चित्र आहे.

शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आता लक्ष ग्रामपंचायतीच्या नोटिसांनंतरच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT