Sangram Jagtap  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dheerajsinh Rajput Murder Case : धीरजसिंह हत्या प्रकरणात संग्राम जगतापांचा पोलिसांवर गंभीर आरोप; SITवर मंत्री विखे काय म्हणाले?

Sangram Jagtap questions police probe; Radhakrishna Vikhe backs investigation : हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा जगतापांचा दावा; विखे पाटील म्हणाले, पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून गरज भासल्यास SITची शिफारस.

Pradeep Pendhare

Ahilyanagar murder case latest update : धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याच्या मुकुंदनगर मुस्लिम बहुल भागातील हत्याप्रकरणात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत थेट अहिल्यानगरच्या पोलिसांच्या तपासावर शंका घेतली. पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप केला.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र पोलिसांची बाजू घेत, पाठराखण केली. हत्येची घटना दुर्दैवी आहे. बहुतेक आरोपी अटक झाले आहेत. सरकारी यंत्रणेला त्यांचे काम करू दिले पाहिजे. पोलिस अधीक्षकांची चर्चा करून, आवश्यता वाटल्यास, एसआयटीची शिफारस करता येईल, असे सांगून आमदार जगतापांच्या एसआयटीची मागणीचे पालकमंत्री विखे पाटील यांनी थेट समर्थन केले नाही.

मुकुंदनगरमधील बहुल मुस्लिम भागात धीरजसिंह याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात पुढे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक आहेत. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) या घटनेच्या सुरूवातीपासून पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतून पत्रकार परिषद घेत, पोलिसांच्या तपासावर गंभीर आरोप केले. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच स्वतंत्र अधिकाऱ्याकडून तपास करण्याची मागणी केली.

आमदार जगतापांकडून पोलिसांवर (Police) याप्रकरणात गंभीर आरोप करत असतानाच, भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांच्या तपासाचे समर्थन केले आहे. हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांचा तपास योग्य दिशेने असून, गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांना अटक केल्याचे सांगितले.

आमदारांचे आरोप ऐकले आहेत. हत्येची घटना दुर्दैवी आहे. याप्रकरणात संग्राम जगतापांनी केलेल्या विधानांची, घटनेची त्यांच्याशी बोलून अधिक माहिती घेऊ. पोलिसांची कारवाई सुरू आहे. सरकारी यंत्रणेले त्यांच्या काम करून दिले पाहिजे. पोलिसांवर मनोबल वाढवून त्यांच्या कामाला लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले पाहिजे, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

या घटनेत पाकिस्तान कनेक्शन जोडले जात असून, एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली जात आहे. तसे आंदोलनातून आरोप देखील झाले. यावर मंत्री विखे पाटील यांनी, देशविरोधी शक्तींचा दुरान्वये संबंध असतील, तर त्याची चौकशी होईल. पोलिस अधीक्षकांची चर्चा करून, आवश्यकता भासल्यास एसआयटीसाठी सरकारकडे शिफारस करू, असे सांगितले. मुकुंदनगरमधील धीरजसिंह आणि श्रीरामपूरमधील आकाश दुबय्या यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांचे बारकाईने तपास सुरू आहे, असा पुनरूच्चार मंत्री विखे पाटील यांनी केला.

सागर बेगच्या आरोपावर मंत्री विखेंचे भाष्य...

हिंदुत्ववादी नेते सागर बेग याच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेने पोलिसांच्या दबावामुळेच तक्रार दाखल केल्याचा दावा पत्रकार परिषदेत घेत केला होता. मंत्री विखे पाटील यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. वस्तुस्थिती तपासाअंती समोर येईल आणि माझ्या वक्तव्याने चौकशीवर परिणाम होऊ नये, म्हणून मी बोलत नसल्याचे सांगत प्रकरणावर अधिक बोलणे टाळले. दुसरीकडे, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दबावाचे आरोप फेटाळून लावले. महिलेने शिर्डीत स्वतःच्या पद्धतीनुसार जबाब दिला. निष्पक्ष चौकशी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT