Dhule Crime Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : सैन्य दलातील जवान पतीनं पत्नीला इंजेक्शन देऊन मारलं, धुळ्यात धक्कादायक घडलं...

An army soldier in Dhule allegedly killed his wife by injecting her with poison : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच राज्यात आणखी तशा स्वरुपाच्या धक्कादायक घटना एक-एक करुन समोर येत आहे. धुळ्यात देखील एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे.

Ganesh Sonawane

Dhule Crime : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच राज्यात आणखी तशा स्वरुपाच्या धक्कादायक घटना एक-एक करुन समोर येत आहे. धुळ्यात देखील एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. सैन्य दलात जवान असलेल्या पतीने आपल्या पत्नीला इंजेक्शन देऊन ठार मारलं आहे. विवाह बाह्य संबधांत अडसर ठरत असल्याने पत्नीला ठार केलं. याप्रकरणी तिच्या सैन्य दलातील जवान पती, पतीची प्रेयसी सह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

शारदा उर्फ पूजा कपिल बागुल (वय ३८) असे मयत महिलेचे नाव आहे. पतीने चक्क पत्नीला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देवून तिला ठार केलं. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालातही विषप्रयोग आणि डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती कपिल बाळू बागुल (वय ४३) याने व इतर चौघांनी मिळून पूजा'ला मारलं. त्यांनी तीला कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. धक्कादायक म्हणजे, तीचा मृत्यू होईपर्यंत कपिल हा तिच्याकडे पाहत बसला. मृत्यू झाल्यानंतर तिला त्याने हॉस्पिटलमध्ये नेण्याचं नाटक केलं. मात्र हॉस्पिटलने जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर कपिल याने इतर चौघांच्या मदतीने तिच्या अंत्यविधीची तयारी केली. याबाबत पश्चिम देवपुर पोलिसांना कळवल्यानंतर पूजाचा मृतदेह आणला गेला आणि शवविच्छेदन करण्यात आले. त्यात स्पष्ट झाले की, कपिल आणि चौघांनी तिला पकडून तिच्या हातावर पाय ठेवून तिला इंजेक्शन दिले आणि तिचा खून केला.

2010 साली कपिल बागुल आणि शारदा या दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर पती कपिल बागुल हा पत्नी शारदा बागुलचा छळ करत होता. याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षीच तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु महिला आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे.

प्लॉटसाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, असा सतत तगादा लावत पूजा हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. तिच्यावर वेळोवेळी अत्यंत अमानवी वागणूकही केली गेली. दरम्यान, पती कपिल बागुल याचे प्रज्ञा महेश कर्डीले हिच्याशी असलेल्या अनैतिक संबंधांची माहिती पूजाला मिळाल्यानंतर, तिने त्यास विरोध दर्शवला. म्हणून तीचे सासरे बाळु बुधा बागुल, नणंद रंजना धनेश माळी व प्रज्ञा महेश कर्डीले यांनी कपिल बागुल व सासू विजया बागुल यांना चिथावणी व प्रेरणा दिल्यामुळे कपिल बागुल व त्यांची आई विजया बागुल यांनी पुजा हिच्यावर विष प्रयोग करुन तीला कशाचे तरी सहाय्याने डोक्यावर मारुन तिचा खून केला आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT