धुळे : शहरालगत एमआयडीसीमध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प आणून तरूणाईला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. हा संकल्प साकार होण्यासाठी अधिकाधिक मताधिक्याने भाजप महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून द्यावे, असे आवाहन शहराचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी केले.
धुळे शहर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमदेवार अनुप अग्रवाल यांच्या प्रचारार्थ मोहाडी परिसरातील भटाई माता चौकात संकल्प सभा झाली. उमेदवार अग्रवाल, माजी नगरसेवक महेश मिस्तरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, हर्षकुमार रेलन, शीतल नवले, सारीका अग्रवाल, संजय गुजराथी, राजेश पवार,
भगवान देवरे, सुरेखा देवरे, दगडू बागूल, विठ्ठल गावडे, योगेश पाटील, प्रवीण पवार, देविदास गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. अग्रवाल यांच्या उपस्थितीत मोहाडी भागातील शिवसेनेचे (उबाठा) संतोष पारख, योगेश शेलार, सागर सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
उमेदवार अग्रवाल म्हणाले, की धुळेकरांना दर्जात्मक पायाभूत सुविधा मिळवून देणे, तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचा भाजप महायुतीचा संकल्प आहे. त्यासाठी केंद्राप्रमाणे राज्यातही महायुतीचे सरकार आल्यास पाठपुराव्यातून भरीव निधीची उपलब्धता करता येऊ शकेल. अनेक वर्षांपासून मोहाडी भागात एमआयडीसी आहे.
परंतु, वीड, पाण्याचा प्रश्न असल्याने मोठे औद्योगिक प्रकल्प येऊ शकले नाहीत. धुळेकरांनी एका विरोधकास तीन वेळा आमदारकीची संधी दिली. विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ त्यांच्याच घराजवळील भागात विकास कामे केली. त्यामुळे एमआयडीसी समस्याग्रस्त राहिली. या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. भाजप महायुतीच्या माध्यमातून वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करू.
मनमाड- इंदूर रेल्वे मार्गांतर्गत नरडाणा- बोरविहीर मार्गाच्या पहिल्या टप्प्यात फागणे गावाजवळ रेल्वे स्टेशन होणार आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळू शकेल. ते महायुती सरकारमुळे शक्य होणार आहे. त्यासाठी भाजप महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य द्यावे, असे आवाहन उमेदवार अनुप अग्रवाल यांनी केले. श्री. मिस्त्री म्हणाले, महायुती सरकार सत्तेत आले नाही तर ही योजना बंद होऊ शकते. त्यामुळे ही योजना कायम सुरु राहण्यासाठी महायुतीसह उमदेवार अग्रवाल यांना पाठबळ द्यावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.