Ram Bhadane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: आमदार राम भदाणे यांचा लढा यशस्वी; धुळ्याच्या त्या गावांना मिळणार पाणी!

Dhule BJP irrigation minister Girish Mahajan meeting follow-up for water of MLA Ram Bhadane successful?-आमदार राम भदाणे यांच्या मतदारसंघातील पाण्यापासून वंचित गावांना मिळणार न्याय

Sampat Devgire

Dhule Water Politics: धुळे ग्रामीण मतदारसंघातील पाण्याच्या राजकारणाला नवा आयाम मिळाला आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित गावांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे प्रदीर्घकाळ सुरू असलेला लढा यशस्वी होणार आहे.  

धुळे ग्रामीण मतदार संघातील अनेक गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार राम भदाणे यांनी पुढाकार घेतला. गेले काही दिवस ते सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते. 

यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाची बैठक झाली. बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार झाला. त्यातून या गावांना पाणी देण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाय सुचविले आहेत. 

आमदार राम भदाणे यांनी आपल्या मतदारसंघातील सोनगीर, दापूरा, सरवड, कापडणे, देवभाने, दमाने, नगाव, बिलाडे, वडेल, निकुंभे, मेहरगाव यांचा विविध गावांच्या पाण्याचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील करीत होते. त्यांच्या कारकिर्दीत हा प्रश्न रेंगाळला होता. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर आता अंतिम तोडगा सुचविला आहे. जिल्ह्यातील सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या गावांना आता पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी दिल्या.  

धुळे जिल्हा राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक आणि सक्रिय मानला जातो. मात्र पाण्याचा प्रश्न यातील अनेक गावांमध्ये तीव्र आहे. काही निवडणुकांमध्ये पाण्याचा प्रश्न निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला होता. या संदर्भात सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात होती. 

आमदार राम भदाणे यांनी या दृष्टीने केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे. पाटबंधारे विभागाने या संदर्भात सिंचन आणि पिण्याचे पाणी या दोन्ही दृष्टीने अहवाल तयार करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यात आमदार भदाणे यशस्वी झाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT