Eknath shinde with Dhule leaders
Eknath shinde with Dhule leaders Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात रस्त्यांचा प्रश्‍न; एकनाथ शिंदेंनी दिला २३ कोटींचा निधी

Sampat Devgire

धुळे : महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत राज्य शासनाने, नगरविकासमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांप्रश्‍नी एकूण मंजूर निधीतून दुसऱ्या टप्प्यात २३ कोटी ३९ लाखांचा निधी दिला. तो शिवसेनेने येथे वारंवार केलेली आंदोलने आणि प्रशासन, शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळाला, अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

शहरातील अपूर्णावस्थेतील रस्त्यांसाठी एकूण मंजूर १०१ कोटींपैकी उर्वरित निधी मिळावा यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे २३ कोटी ३९ लाखांचा निधी मिळाला. हा निधी नगरविकास खात्याकडून वितरित झाला आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. धुळेकर नरकयातना भोगत आहेत. या स्थितीला महापालिकेचा गलथान कारभार व गैरप्रवृत्ती जबाबदार आहे. या सर्व संकटांतून नागरिकांची सुटका व्हावी, गैरसोय दूर होण्यासाठी शिवसेनेने वारंवार आंदोलने, पाठपुराव्यावर भर दिला.

शहरातील अपूर्णावस्थेतील व नादुरुस्त रस्त्यांसाठी मंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हा उपप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख सतीश महाले यांनी निधीची मागणी केली होती.

त्यास सकारात्मक प्रतिसाद देत मंत्र्यांनी तत्काळ २३ कोटी ३९ लाखांचा निधी शहराला दिला. त्यासाठी मंत्री शिंदे यांचे आभार मानत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT