Dr. Subhash Bhamre, Dr. Shobha Bachhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Election: काँग्रेसने टाकला मोठा डाव, भाजपला दोन मतदारसंघात देणार धक्का?

Sampat Devgire

Dhule Lok Sabha News: धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule Lok Sabha Constituency) भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसला प्रयत्न करूनही अद्याप प्रबळ उमेदवार मिळालेला नाही. उमेदवारीसाठी चाचपडणाऱ्या काँग्रेसला एक मोठा नेता हाती लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाला धुळे मतदारसंघासाठी प्रयत्न करूनही प्रबळ उमेदवार मिळालेला नाही. यासंदर्भात सहकारी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुचविलेला पर्यायदेखील काँग्रेसने अमान्य केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या नेत्यांनीदेखील ही जागा सोडल्यास प्रबळ उमेदवार देणार असे सांगण्यात आले होते. मात्र काँग्रेसने आपल्या पारंपरिक मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. या स्थितीत पक्षाकडे उमेदवार कोण? हा चर्चेचा विषय आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे आहे. थोरात यांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने एक मोठा डाव टाकला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नंदुरबार शहराचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांना धुळे मतदार संघातून उमेदवारीचा पर्याय देण्यात आला आहे. रघुवंशी यांच्या समर्थकांनादेखील हा पर्याय स्वीकारावा अशी विनंती त्यांनी केली आहे. या संदर्भात रघुवंशी यांनी निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे धुळे (Dhule) मतदारसंघासाठी आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

रघुवंशी यांचा नंदुरबार आणि धुळे (Nandurbar and Dhule) जिल्ह्याच्या राजकारणावर चांगला प्रभाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत. धुळे शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेस (Congress) आणि रघुवंशी यांचे चांगले सख्य आहे.

त्यामुळे काँग्रेसने दिलेला प्रस्ताव रघुवंशी यांनी स्वीकारल्यास धुळे आणि नंदुरबार या दोन्ही मतदारसंघांमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे कालपर्यंत उमेदवारीसाठी चाचपडणाऱ्या काँग्रेसला एक मोठा डाव टाकण्याची आयतीच संधी उपलब्ध झाली आहे. ती कितपत प्रत्यक्षात येते, हे रघुवंशी यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र रघुवंशी यांचे नाव पुढे आल्याने काँग्रेस पक्षातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीचा निर्णय घेण्यासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे आणि नाशिकच्या माजी महापौर व माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav) या दोघांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. त्यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल. यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी उमेदवारीचा निर्णय घेण्यास विलंब झाल्याने काँग्रेसला मतदारसंघात प्रचार यंत्रणा उभी करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT