Municipal Election News: राज्यभरात नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागले आहेत. अशातच मनमाड आणि पिंपळनेर येथे दुर्दैवी घटना घडली.
नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांपुढे कमी प्रश्न निर्माण झाला आहे. मनमाड येथील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नितीन वाघमारे या उमेदवाराचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे प्रचारात अडचणी आल्या.
पिंपळनेर (धुळे) येथील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग दोन मधील उमेदवार कुसुमबाई पात्रे यांचे देखील हृदयविकाराने निधन झाले. मंगळवारी हा दुःखद प्रसंग पक्षावर ओढवला. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या प्रचार काही थांबवला.
नगरपालिका निवडणुकीत मनमाड आणि पिंपळनेर येथे दोन उमेदवारांचे निधन झाले. त्यामुळे संबंधित प्रभागातील निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकीचा निकाल कसा जाहीर करणार? हा पेच प्रशासनापुढे आहे.
या संदर्भात प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. उमेदवारांचे निधन झाल्याने निवडणुकीवर परिणाम अपरिहार्य आहे. राजकीय पक्षांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे आयोग काय मार्गदर्शन करते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचाराला जोरदार गती दिली होती. निवडणूक चिन्हांचे वाटप होणार होते. त्यामुळे नगरपालिका निवडणूक चर्चेत होती. विशेष म्हणजे पिंपळनेर येथे भाजप पक्ष आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पण आलं लागली आहे.
मनमाड येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. येथे भाजपने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच प्रचारसभा देखील झाली होती. या स्थितीत विरोधात असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.