Uddhav Thakrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनाला अनोखी भेट!

धुळ्याच्या भगीनीची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यंदाच्या रक्षाबंधनाला दिली अनोखी भेट

Sampat Devgire

धुळे : राखीपोर्णीमा हा भाऊ- बहिणीचा पवित्र सण मानला जातो. त्याला अनेक अर्थांनी महत्त्व असल्याने भाऊ-बहिणीचे नाते प्र्सथापित करणाऱ्या या सणाला धुळ्याच्या एका भगीनीने नवा आयाम दिला आहे. त्यांनी राखी पोर्णीमेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्जमुक्तीसाठी आभारासह राख्या पाठवणार आहेत. (Dhule`s loan waiver farmers womens will send bands to Uddhav Thakrey)

भारतीय जनता पक्षाकडून देशभरात सुरु असलेल्या विरोधी पक्षाच्या सरकारांचे आमदार फोडण्याचे जे काम सुरु केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या आमदारांवर सातत्याने आरोप करणारी एक टीम निर्माण केली होती. त्याची धास्ती घेऊन शिवसेनेचे आमदार फुटले.त्यात शिवसेना कमकुवत करण्याचा प्रयत्न होता. मात्र सामान्य मतदार, नागरीकांची सहानुभूती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वाढत आहे. त्याचे प्रतिबिंब धुळ्याच्या शेतकरी महिलेने केलेल्या या उपक्रमांत दिसून येते.

दोन दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनाच्या तोंडावर येऊन ठेवलेला असताना धुळ्याच्या साक्री तालुक्यातून कर्जमुक्त झालेल्या शेतकरी महिलांतर्फे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधन या सना निमित्त राखी सोबत "आम्ही शेतकरी उद्धव साहेबांसोबत" असल्याचे म्हणत या आशयाचे पत्रक मातोश्रीवर पाठवले जाणार आहे.

रक्षाबंधनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या महिलांतर्फे राख्यांसह अनोखी भेट पाठवली जात आहे. या पत्रामध्ये आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहणार असल्याचा देखील उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे, त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धुळ्यातून शेतकरी बहिणींकडून अनोखी भेट दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT