Dilip Borse Won Baglan Assembly constituency Result: बागलाण मतदारसंघात भाजपच्या आमदार दिलीप बोरसे यांनी इतिहास घडवला. आमदार बोरसे यांनी १.२९ लाख मतांनी विजय संपादन केला. त्यांनी मताधिक्याचा विक्रम घडवला. त्यामुळे बागलाण मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे.
आज झालेल्या मतमोजणीत वीस फेऱ्यांत भाजपचे विद्यमात आमदार बोरसे यांना एक लाख एकोणतीस हजार ६३८ मताधिक्य मिळाले. आमदार बोरसे यांना एक लाख एकोणसाठ हजार ९८३ मते मिळाली. त्यांच्या विोरधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांना अवघी तीस हजार ३४५ मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये आमदार बोरसे यांना १००४ तर चव्हाण यांना ५४६ मते मिळाली.
बागलाण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पारंपारिक लढत यंदाही झाली. भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी यंदा मोठे आव्हान दिल्याचे चित्र होते. मात्र ते अपयशी ठरले. त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
प्रहार जनशक्ती पक्षाने जय श्री गरुड आणि वंचित बहुजन आघाडी ने आनंद चौरे उमेदवारी दिली होती. सतरा उमेदवार रिंगणात असले तरीही अंतिम लढत आमदार बोरसे आणि माजी आमदार चव्हाण यांच्यातच झाली.
विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार बोरसे यांनी दीपिका चव्हाण यांचा 23 हजार 294 मताधिक्क्याने पराभव केला होता. त्यावेळी तिसऱ्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवाराला नगण्य मत मिळाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या डॉ सुभाष भामरे यांनी येथून आघाडी घेतली होती. मात्र गतनिवडणुकीच्या तुलनेत या आघाडीत जवळपास 40 हजार मतांची घट झाली होती. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत काय होते, याची उत्सुकता होती.
यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चव्हाण यांच्या प्रचारासाठी पक्षाने आपली ताकद झोकून दिली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या सभा येथे झाल्या. दीपिका चव्हाण गेली पाच वर्षे मतदार संघातील विविध प्रश्न आणि राजकीय विषयांबाबत सक्रिय होत्या. त्याचा लाभ त्यांना या निवडणुकीत प्रचारात झाला.
अप्पर पूनद प्रकल्प औद्योगिक वसाहत वाहतुकीच्या अडचणी रस्त्यांची दुरावस्था आणि महागाई व बेरोजगारी या प्रश्नां भोवती निवडणूक प्रचार झाला. मात्र मतदारांची विभागणी उमेदवारांच्या व्यक्तिगत संपर्कानुसारच झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक अतिशय आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरे गेले, असे चित्र होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.