Shinde Group criticize BJP : आदिवासी राजकारणाचे केंद्र असलेल्या नंदूरबारमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र हा पक्ष मणिपूरमधील अत्याचारांमुळे चांगलाचस अडचणीत आला आहे. त्यांचा सहकारी पक्ष एकनाथ शिंदे गटानेच भाजपवर हल्ला करीत मणिपूरचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. (It is very unfortunate the silence of BJP leadership on Manipur issue)
यासंदर्भात शिवसेना (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Nandurbar) यांनी भाजवर (BJP) थेट हल्ला केला आहे. मणिपूर राज्यातील आदिवासींवरील अत्यंत अत्याचार आहे. भाजपचे नेतृत्वा यावर गप्प असल्याने सगळ्यांनी निषेध करावा.
यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यात मणिपूर राज्यातील हिंसेच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी कडकडीत बंदल ठेवण्यात आला आहे. मणिपूरमध्ये ज्या दुर्दवी घटना घडत आहेत, त्याचा आम्ही सर्व जाहीरपणे निषेध करीत आहोत. आदिवासी समाजावर अन्याय होत असताना भाजप त्यावर बोलायला तयार नाही, याचा खेद वाटतो, असे श्री. रघुवंशी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भाजपचेच सरकार मणिपूरमध्ये आहे. त्याच पक्षाचे सरकार केंद्रामध्ये आहे. तरीही आदिवासींवर अन्याय होतो आहे. आदिवासी समाजावर एव्हढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचा खेद वाटतो. त्याचा आपण जाहीर निषेध करू या.
जे घडते आहे, ते माहीत देखील पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मे महिन्यात घडलेल्या महिला अत्याचाराचा व्हीडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्या आदिवासी भगीनींना विवस्त्र करून अन्याय, अत्याचार केले, त्यांची धींड काढण्यात आली. खरं म्हणजे आदिवासींना काही लोक वनवासी म्हणतात, त्याचा देखील आम्ही निषेध करतो, असे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नामोल्लेख न करता टिका केली.
माजी आमदार रघुवंशी म्हणाले, आदिवासी हा या देशाचा मुळ मालक आहे. त्याच्यावरच जर अन्याय होत असेल, तर त्या गोष्टीचा निषेध आपण केलाच पाहिजे. जे मणिपूरमध्ये घडते आहे, ते अन्यत्र कुठेही घडता कामा नये, यासाठीच आम्ही बंद पुकारला आहे.
त्यांनी भाजपवर टिका करीत हा पक्ष सत्तेसाठी असे कसे करू शकतो, याचा खेद वाटत. ते म्हणाले, हा एका आदिवासी समाजापुरता विषय नाही, राजकारणाचा विषय नाही. एव्हढे अन्याय, अत्याचार होत आहेत, तरी देखील त्याची वाच्यताही होत नाही, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन ते सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवाट लावावी अशी आमची मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.