<div class="paragraphs"><p>ShivSena, NCP&nbsp;</p></div>

ShivSena, NCP 

 

sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

अवैध धंद्यावरुन महाविकास आघाडीत वाद; शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावरून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) हे दोन पक्ष आमने सामने आले आहेत. त्यांनी एकमेकाविरूध्द जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, नगरपरिेषदा निवडणुकीत महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत दिसत आहेत.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हा वाद पेटला आहे. या निवडणुकीत शिवसेना (ShivSena), राष्ट्रवादी कॉंग्रेस आमनेसामने होते. मतदानाच्या दिवशी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुक्ताईनगर व वरणगाव, बोदवड तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आर्शिवादाने अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला. त्यावर तातडीने कारवाई करावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांच्यावर कारवाई न केल्यास मोर्चा काढण्याचा ईशाराही राष्ट्रवादीने दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आरोपानंतर शिवसेनाही आक्रमक झाली. त्यांनीही गुरुवारी जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आर्शीवादानेच या भागात अवैध धंदे सुरू आहे. या अवैध धंद्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन व मुक्ताईनगर तालुकाप्रमुख छोटू भोई यांनी राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. या वादामुळे आता जिल्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हा वाद झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालीका निवडणुकीत महाविकास आघाडीत फुट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT