Advocates given Memorandum to DIG of Police
Advocates given Memorandum to DIG of Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा न्यायालयातील सर्व वकील घाबरतात तो अब्दुल लतीफ आहे तरी कोण?

Sampat Devgire

नाशिक : येथील जिल्हा न्यायालयात एकच दहशत पसरली होती. सर्व वकिलांनी मोर्चा काढण्याचे ठरवले. मात्र कोरोनाची बंधने असल्याने या वकिलांनी थेट पोलिस आयुक्तालय गाठून संरक्षणाची मागणी केली. कारण होते अब्दुल लतीफ यासिन कोकणी (Abdul latif yasin konkani) ही व्यक्ती. सबंध शहरात तो चर्चेचा विषय़ होता.

या अब्दुल लतीफ यासिन कोकणी याने यापूर्वीही पोलिस अधिकारीच नव्हे तर वकिलांना देखील थेट धमकी देत धक्काबुक्की केली होती. गेल्या आठवड्यात त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. न्यायालयाने देखील त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वकील निर्धास्त झाले होते. मात्र आज तो पुन्हा न्यायालयात आला. यावेळी त्याने काही वकिलांनी दरडावत पुन्हा एकदा थेट जीवावर बेतेल असा वाद घातला. त्यामुळे एका वकिलाने तर थर थर कापत वकिलीच बंद करण्याचा विचार व्यक्त केला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या वकिलांनी त्याचा निषेध करत पोलिसांनी त्याच्यावर गंभीर कारवाई करण्याची मागणी केली. बुधवारी जिल्हा न्यायालयातील जुनी बार लायब्ररी येथे बैठक झाली. त्यातील निर्णयानुसार अब्दुल लतीफ यासिन कोकणी याने वकिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या निषेधार्थ त्याच्याविरुद्ध तडीपारीची व मोक्काची कारवाई व्हावी. भविष्यात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायमस्वरूपी पायबंद बसावा ह्याकरिता आज सकाळी नासिक जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे दोनशे ते तीनशे वकीलांनी एकत्र येत त्याचा निषेध केला.

पोलीस आयुक्तांनी कोरोनाच्या परिस्थितीत वकीलांच्या मुक मोर्चास परवानगी नाकारल्याने तेथेच निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्यावतीने विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सदर व्यक्ती विरोधात जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नासिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे, अॅड दिलीप वनारसे, सेक्रेटरी अॅड जालिंदर ताडगे, सहसचिव अॅड शरद गायधनी, खजिनदार अॅड संजय गिते, सदस्य अॅड शरद मोगल, अॅड दिपक पाटोदकर, अॅड महेश आहेर, अॅड अजिंक्य गिते, अॅड मोहन निसाळ, अॅड प्रतिक शिंदे आदी वकील हजर होते.

..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT