Dr Ashok Uike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Ashok Uike Politics: आदिवासी बिऱ्हाड मोर्चा... सरकारने ठेकेदारांना मोठे करणे थांबवावे!

Dr Ashok Uike; Tribal protesters will create a dilemma for Minister Dr. Uike, now villagers have given a warning -आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यावर बिऱ्हाड मोर्चेकरांच्या मागण्यांचा दबाव वाढणार

Sampat Devgire

Tribal Politics News: राज्यातील आदिवासी आश्रम शाळा १७९१ शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती होणार आहे. त्या विरोधात सुरू असलेले बिऱ्हाड आंदोलन आता आणखी तीव्र होण्याचे चिन्ह आहेत.

आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी कंत्राटी कामगार भरणारच अशी हेकेखोर भूमिका घेतली आहे. त्या विरोधात कामगार कृती समितीने बिऱ्हाड मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. तिकडे विविध गावातील शालेय समित्यांनी देखील या बिऱ्हाड आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

विविध गावांतील शालेय समित्यांच्या सदस्यांनी आज बिऱ्हाड मोर्चाच्या समर्थनार्थ पाऊल टाकले. आदिवासी विकास आयुक्तांना निवेदन देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या २२ जुलैपासून आश्रम शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन आता गाव स्तरावर देखील पोहोचले.

दरम्यान या आंदोलनाला नाशिक जिल्हा कामगार कृती समितीच्या सर्व संघटनांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. एक-दोन दिवसात ही समिती आंदोलनात देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कामगार कृषी समितीचे नेते डॉ डी. एल. कराड यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला आहे. संबंधित कर्मचारी अनेक वर्षांपासून आश्रम शाळांमध्ये काम करीत आहेत. खरे तर त्यांना नियमित सेवेत घेण्याची आवश्यकता आहे. सरकारची इच्छा असेल तर सर्व काही होऊ शकते. सरकारकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे सरकारने बाह्य स्त्रोत म्हणजेच ठेकेदारांकडून कामगार नियुक्ती हे धोरण पुढे केले आहे. हे आदिवासी आणि कर्मचारी विरोधात आहे.

सरकारने आदिवासी आणि कामगारांचा विचार केला पाहिजे. ठेकेदारांना मोठे करण्याचे काम सरकारने तातडीने थांबवावे अशी मागणी डॉ. कराड यांनी केली. दरम्यान माजी आमदार जे. पी. गावित यांनी काल बिऱ्हाड मोर्चा बाबत आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेतली. आदिवासी विकास मंत्री आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माजी आमदार गावीत सध्या मंत्रालयात ठाण मांडून बसले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनाचा प्रभाव एकच वेळी मंत्रालय, मनसेचे नेते राज ठाकरे, आदिवासी विकास भवन आणि आता गाव पातळीवर पोहोचला आहे. यामध्ये आदिवासी विकास मंत्री अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT