Keda Aher & MLA Dr Rahul Aher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Rahul Aher Politics: डॉ राहुल आहेर यांचे भाऊ केदा आहेर यांना सडेतोड उत्तर, दिला थेट इशारा...

Dr. Rahul Aher; Dr Rahul Aher's clear reply to rebel brother Keda Aher-चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये आमदार राहुल आहेर यांना भावानेच बंडखोरी करून आव्हान दिले आहे.

Sampat Devgire

Chandwad Constituency News: गेले आठवडाभर चांदवड मतदारसंघात भाजपच्या दोन भावांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. बंडखोरीमुळे त्याची सगळीकडे चर्चा होती. भारतीय जनता पक्षातील हा वाद चर्चेचा विषय आहे.

भाजपकडून चांदवड- देवळा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारी आधी डॉ आहेर यांनी आपल्याला उमेदवारी नको. त्या ऐवजी भाऊ केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी, अशी विनंती पक्षाला केली होती.

मात्र पक्षाने आमदार डॉ आहेर यांनाच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाफेड चे संचालक व प्रबळ इच्छूक केदा आहेर आणि आमदार डॉ आहेर या दोन भावांमध्येच भाऊबंदकीचा वाद राजकीय भांडणात रूपांतरित झाला होता.

केदा आहेर यांनी आमदार डॉ आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. येत्या निवडणुकीत आमदार आहेर यांनी आपला केसाने गळा कापला. घोर फसवणूक केली. त्यामुळे यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार डॉ आहेर यांनी शनिवारी चांदवड येथे निवडणूक तयारीसाठी मेळावा घेत केदा आहेर यांना संदेश दिला. या मेळाव्यात त्यांनी केदा आहेर यांना स्पष्ट इशारा दिला आहे. आरोपांना देखील त्यांनी थेट उत्तर दिले.

आमदार डॉ आहेर म्हणाले, गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामे केली आहेत. त्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो आहे. या माध्यमातून भाजपचा मोठा विस्तार मतदारसंघात झाला.

भाजपची मोठी ताकद या मतदारसंघात उभी राहिली आहे. या ताकदीचा सामना कोणीही करू शकणार नाही. कार्यकर्ते हेच आमचे बळ आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सुद्धा जो कोणी समोर येईल, त्याला या ताकदीचा सामना करता येणार नाही, असे थेट उत्तर दिले.

यानिमित्ताने येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात चांदवड मतदार संघात बंडखोरी झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा भाजपचे आमदार डॉ आहेर यांच्या विरोधात काँग्रेसने माजी आमदार शिरीष कोतवाल यांना उमेदवारी दिली आहे.

या दोन्ही उमेदवारांत तिसऱ्यांदा लढत होत आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन्ही निवडणुकीत चांदवड मतदारसंघातून बंडखोर अथवा मत विभागणीसाठी तिसरा उमेदवार उभा राहिला होता. यंदा प्रहार संघटनेने गणेश निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. ते चांदवड तालुक्यातील आहेत.

भाजपचे बंडखोर केदा आहेर हे देवळा तालुक्याचे आहेत. अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही उमेदवारांच्या मतांना समान वाटेकरी आहेत. दोन्ही उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी समान संधी आहे. त्यात कोण वरचढ ठरतो, याची आता सगळ्यांना उत्सुकता आहे.

या निमित्ताने दोन भाऊ निवडणूक मैदानात उतरले आहेत. दोघेही परस्परांना थेट आव्हान देत आहेत. त्या दृष्टीने चांदवड मतदारसंघातील यंदाची निवडणूक आमदार राहुल आहेर यांची परीक्षा घेणारी ठरेल, हे मात्र नक्की.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT