Kirit Somaiyya & Dr Shobha Bachhav Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Shobha Bacchav Politics: मतदान केले नाही म्हणून भाजप मालेगावला शत्रू समजते काय?

Dr Shobha Bacchav; BJP leader kirit Somaiya is not investigator, Congress criticize-काँग्रेस खासदाराचा इशारा, बांगलादेशींच्या नावाखाली भाजपचे किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहराची बदनामी थांबवावी

Sampat Devgire

Dr Shobha Bacchav News: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे मालेगावची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. येथे बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्याला काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी सडेतोड उत्तर दिले.

मालेगाव मध्ये अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखला घेतल्याचा ठपका तीन नागरिकांवर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई सुरू आहे. त्यावरून भाजपचे किरीट सोमय्या यांनी राजकारण तापवले आहे. माजी आमदार आसीफ शेख देखील त्यात आघाडीवर आहेत.

काँग्रेसच्या खासदार डॉ बच्छाव सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांनी आज एसआयटी चे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या संदर्भात पोलिसांनी पारदर्शक पद्धतीने तपास करून नागरिकांना विश्वासात घ्यावे. अन्यथा त्याचा गैरफायदा राजकीय शक्ती घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार डॉ बच्छाव यांनी श्री सोमय्या यांची चांगलीच झाडाझडती घेतली. सोमय्या हे कोणत्याही शासकीय व्यवस्थेचे भाग नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतः तपास करीत असल्यासारखे वर्तन करू नये. एसआयटी स्थापन केलेली असताना सोमय्या याबाबत त्यात लुडबुड का करीत आहेत. हे सर्व जनतेला कळून चुकले आहे. सोमय्या हे भाजपचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठीचे बाहुले आहे, सर्वांना ठाऊक आहे.

मालेगाव शहराची जनता देशावर आणि राज्यघटनेवर प्रेम करते. आपली राज्यघटना ही सेक्युलर आहे. मालेगाव मधील मतदार देखील सातत्याने फक्त सेक्युलर उमेदवारालाच मतदान करीत आले आहेत. भाजप अल्पसंख्यांक समाजाला सातत्याने लक्ष्य करीत आला आहे. ते मालेगाव शहरात मतांची अपेक्षा करताच कसे?

भाजप आणि त्याचे नेते हे राज्यघटनेतील सेक्युलर तत्वाच्या विरोधी आहेत. त्यामुळे कधीही मालेगावचे नागरिक त्यांना मतदान करीत नाही. गेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला येथे अवघे चार ते पाच हजार मतदान मिळत आले आहे.

निवडणुकांचा इतिहास भाजपने पाहिला पाहिजे. मालेगाव शहराचा मुद्दा करून भाजप अन्य शहरांमध्ये राजकारण करणे करीत आहे. मालेगावच्या नागरिकांनी मतदान केले नाही, म्हणून भाजपने मालेगावला शत्रू समजून नये. मालेगाव हे देखील याच भारतातील आणि देशातील नागरिकांचे शहर आहे. सोमय्या यांनी सुरू केलेली बदनामी आणि त्या आधारे मालेगाव शहरातील काही मंडळी करीत असलेले राजकारण अतिशय चुकीचे आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT